शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

तेव्हा पंतप्रधान मोदींच्या कानात काय सांगितले, अखेर त्या युवकाने गुपित उघड केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 13:47 IST

West Bengal Assembly Elections 2021 : ममतांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून बंगाल काबीज करण्यासाठी कंबर कसणाऱ्या भाजपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही जोरदार प्रचारसभा घेत आहेत. या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींचा एक फोटो व्हायरल झाला होता.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा (West Bengal Assembly Elections 2021 ) प्रचार सध्या जोरात सुरू आहे. ममतांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून बंगाल काबीज करण्यासाठी कंबर कसणाऱ्या भाजपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Narendra Modi) जोरदार प्रचारसभा घेत आहेत. या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींचा एक फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये मोदी एका युवकाच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्यासोबत बोलताना दिसत होते. दरम्यान, आता या फोटोतील तरुणाने समोर येत त्यावेळी पंतप्रधानांना नेमकं काय सांगितलं याचं गुपित उघड केलं आहे. (What the said in  Prime Minister Narendra Modi's ear, the young man Zulfiqar Ali finally revealed the secret)३ एप्रिल रोजी सोनारपूर येथे मोदींची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी झुल्फिकार हा तरुण रॅलीत सहभागी होण्यासाठी आला होता. त्याने नमाजी टोपी परिधान केली होती. त्यावेळी मोदींनी त्याची भेट घेत विचारपूस केली होती. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्या भेटीबाबत माहिती देताना झुल्फिकार म्हणाला, तीन एप्रिलला आयोजित करण्याल आलेल्या सभेला जाण्याची माझी इच्छा नव्हती. त्यापूर्वी ब्रिगेडच्या कार्यक्रमाला गेलो असताना पार्किंगची जबाबदारी माझ्यावर होती. मी तिथपर्यंत पोहोचेन असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकदा पाहावे आणि लांबून नमस्कार करावा, अशी माझी इच्छा होती. मी मोदींना खूप फॉलो करतो.  त्या दिवशी पंतप्रधान मोदी गाडीमधून येत होते. सर्वजण त्यांना हात जोडून नमस्कार करत होते. पंतप्रधान मोदींनीही त्याच अंदाजात नमस्कार केला. त्यानंतर ते गाडीतून उतरले. त्यांनी माझे नाव विचारले. मी सांगितलं माझं नाव झुल्फिकार अली. हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे त्यांना ते ऐकू आले नाही. त्यानंतर ते जवळ आले. मी त्यांना माझं नाव सांगितलं. मग त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून विचारले की, तुला काय बनायचं आहे. तेव्हा मी त्यांना सांगितले की, मला नगरसेवक, आमदार, खासदार बनायचे नाही तर मी राष्ट्रहितामध्ये काम करू इच्छितो. 

यावेळी आपल्या भागाचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा होत असल्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली. मंत्री फिरहाद हकीमसुद्धा या भागाला मिनी पाकिस्तान म्हणतात. पण आमच्यासारखे भारतीय जोपर्यंत आहेत, तोपर्यंत या भागाला पाकिस्तान आणि बांगलादेश बनू देणार नाही. जे लोक देशहिताबद्दल, कुटुंबाबद्लल आणि देशाचा विचार करतात, ते या भागाला पाकिस्तान, बांगलादेश बनू देणार नाहीत असेही त्याने यावेळी ठणकावून सांगितले.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाMuslimमुस्लीमPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी