शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

ममतांसोबतची घटना घातपात नाही तर अपघात, तरीही निवडणूक आयोगाने केली मोठी कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 19:15 IST

West Bengal Assembly Elections 2021 : बुधवारी ममता बॅनर्जी नंदिग्राममध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या कारच्या फूटबोर्डवर उभ्या राहून उपस्थितांना अभिवादन करत होत्या. त्यावेळी गर्दीतून कुणीतरी त्यांना धक्का दिला.

नवी दिल्ली/कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदिग्राम येथे प्रचारादरम्यान जखमी झाल्याने मोठ्या राजकीय वादाला तोंड फुटले होते. आपल्यावर प्रतिस्पर्धी भाजपाकडून हल्ला करण्यात आल्याचा दावा ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसकडून करण्यात येत होता. (West Bengal Assembly Elections 2021 ) तर ममता बॅनर्जी ह्या खोटे बोलत असल्याचा दावा भाजपाकडून येत होता. दरम्यान, ममता बॅनर्जींसोबत घडलेली घटना ही घातपात नसून अपघात असल्याचे निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केले. मात्र तरीही या प्रकरणी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. (The incident with Mamata Banerjee was not an accident but an accident, yet the Election Commission took big action)ममता बॅनर्जींना नंदिग्राममध्ये झालेल्या दुखापतीप्रकरणी निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जींच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच पूर्व मिदनापूर जिल्ह्याचे डीएम आणि एसपींनाही पदावरून हटवण्यात आले आहे.  बुधवारी ममता बॅनर्जी नंदिग्राममध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या कारच्या फूटबोर्डवर उभ्या राहून उपस्थितांना अभिवादन करत होत्या. त्यावेळी गर्दीतून कुणीतरी त्यांना धक्का दिला. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना नंदिग्राम येथून कोलकाता येथे आणण्यात आले होते. तसेच उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

दरम्यान, ममता बॅनर्जींनी आज व्हिलचेअरवर बसून पक्षासाठी एका रोड शोचे नेतृत्व केले. यावेळी जखमी वाघ अधिक धोकादायक असतो, असे आव्हानही ममता बॅनर्जींनी दिले. यावेळी टीएमसीचे अनेक वरिष्ठ नेते त्यांच्यासोबत होते. ममता बॅनर्जी हात जोडून लोकांचे अभिवादन स्वीकारत होत्या. तर सुरक्षारक्षक त्यांची व्हीलचेअर पकडून पुढे नेत होते.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग