शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

West Bengal Election Result 2021: मोदी-शहांच्या झंझावातानंतरही बंगालमध्ये तृणमूल टेचात; पण ममता दीदी मोठ्या पेचात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 12:05 IST

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: तृणमूल काँग्रेसकडे मोठी आघाडी; पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पिछाडीवर

कोलकाता: देशातील पाच राज्यांमधील निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मतमोजणीला सुरुवात होऊन तीन तास झाले असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. सुरुवातीला भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये कडवी लढत बघायला मिळत होती. मात्र आता तृणमूलनं जवळपास १९० जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप १०० जागांच्या आसपास पोहोचताना दिसत आहे.बंगालमध्ये वेगळाच खेला होबे! भाजपवर उलटतेय VIP खेळी; रिकामी राहणार दिग्गजांची झोळी? मतमोजणीला सुरुवात होताच भाजप आणि तृणमूलमध्ये काँटे की टक्कर बघायला मिळाली. दोन्ही पक्षांमध्ये अतिशय कमी जागांचं अंतर होतं. मात्र तृणमूलनं शंभरी पार करताच जोरदार मुसंडी मारली. आता तृणमूल काँग्रेस पक्ष २०० च्या जवळ पोहोचला आहे. तर शंभरी पार केलेला भाजप आता खाली येताना दिसत आहे. एका तृणमूल काँग्रेसनं जोरदार आघाडी घेतली असताना दुसरीकडे ममता बॅनर्जी मात्र अडचणीत आल्या आहेत. नंदिग्राममधून निवडणूक लढवणाऱ्या ममता बॅनर्जी सध्या ७ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले ममता यांचे माजी सहकारी सुवेंदू अधिकारी विद्यमान मुख्यमंत्र्यांना कडवी लढत देत आहेत. भाजपचे अनेक दिग्गज उमेदवार पिछाडीवर असताना अधिकारी यांनी मात्र नंदिग्राममध्ये आघाडी घेतली आहे. अधिकारी ममता सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. मात्र निवडणुकीआधी त्यांनी कमळ हाती घेतलं. विशेष म्हणजे ममता बॅनर्जींनी सुवेंदू यांना आव्हान देताना केवळ एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे ममता यांचा पराभव झाल्यास तृणमूलसाठी तो मोठा धक्का असेल.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस