पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. दरम्यान, या ठिकाणी तणमूल कांग्रेसला लक्ष्य करत भाजपनं २०० जागा जिंकण्याचा दावा केला होता. परंतु दुसरीकडे मतदारांनी तृणमूल काँग्रेसलाच मतदान केल्याचं दिसून येत आहे. पश्चिम बंगालमधील विजयासाठी भाजपनं जोर लावला होता. भाजपच्या जागा जरी वाढताना दिसत असल्या तरी तृणमूल काँग्रेसची सत्ताही कायम राहणार असल्याचंच चित्र निर्माण झालं आहे. दरम्यान, यानंतर अभिनेते प्रकाश राज यांनी टोला लगाला आहे. "डन अँड डस्टेड! प्रिय सर्वोच्च नेते, द्वेष आणि विषाणू पसरवणं थांबवा. नागरिकांना स्पष्टपणे म्हटलं आहे. चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करायला लागा. जीवन महत्त्वाचं आहे," असं म्हणत प्रकाश राज यांचा नरेंद्र मोदींना टोला लगावला.
Assembly Election Result 2021 : आता दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरुस्त करायला लागा; प्रकाश राज यांचा नरेंद्र मोदींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 15:19 IST
पश्चिम बंगालमध्ये सध्याच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.
Assembly Election Result 2021 : आता दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरुस्त करायला लागा; प्रकाश राज यांचा नरेंद्र मोदींना टोला
ठळक मुद्देप्रकाश राज यांची नरेंद्र मोदी यांच्यावर टीकापश्चिम बंगालमध्ये सध्याच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.