शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पाकिस्तानी मालिका बघते म्हणून पतीचे पत्नीवर वार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 20:33 IST

पाकिस्तानी मालिका बघते म्हणून चिडलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याचे वार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या हल्ल्यात पत्नी झाली असून स्वारगेट पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

पुणे : पाकिस्तानी मालिका बघते म्हणून चिडलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याचे वार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या हल्ल्यात पत्नी झाली असून स्वारगेट पोलिसांनी पतीला अटक केली आहे. शहरातील सॅलिसबरी पार्क भागात सोमवारी ही घटना घडली.  नर्गिस आसिफ नायब असे जखमी महिलेचे नाव आहे. आसिफ नायब याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.

 आसिफ नायब यांचा होर्डींग लावण्याचा व्यवसाय आहे. तर नर्गिस या गृहिणी आहेत. या दांपत्याला दोन मुले आहेत. नर्गिस यांनी मुलगा  मुलगा आरिफला दुध आणण्यासाठी पाठवले होते. त्याने येताना दुधाची पिशवी फोडली. त्यामुळे आसिफ व  नर्गिस यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी त्यांनी तिला शिवीगाळ करत धमकी दिली होती. तेव्हापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. दरम्यान सोमवारी दुपारी त्यांची मुलगी शिकवणीला गेली होती. . त्यांनी घरात त्यांची सासू, कामवाली बाई यांच्यासोबत जेवण केले. त्यानंतर सासू वरच्या मजल्यावर गेल्या. आणि काम करणारी बाई फरशी पुसत होती तर  पती आसिफ टि. व्ही. पाहात होते. त्यावेळी नर्गिस बेडरुममध्ये जाऊन मोबाईलवर युट्यूबवर पाकिस्तानी मालिका बघत होत्या. 

अचानक संतापलेल्या आसिफ यांनी ओरडत ''तुला पाकिस्तानी ड्रामा बघू नकोस असं   सांगितलेलं कळत नाही का ?' असं विचारत कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी थेट डोक्यावर मारण्यास सुरुवात केल्यास नर्गिस यांनी वार अडवण्यासाठी हात पुढे केला. त्यात त्यांचा अंगठा तुटून पडला. त्यानंतर त्यांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे त्यांचे भाडेकरू धावत आले. त्यांनी नर्गिस यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आसिफला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.सी. उसगावकर करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPakistanपाकिस्तान