शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या माघारीनंतर विजयसिंह खुशीत; तर संजय शिंदे यांची भाजपामध्ये चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 06:45 IST

कार्यकर्त्यांचा आग्रह; विजयदादांच्या नजिकच्या समर्थकांनीही दिले संकेत

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसकडील माढ्याचा गड राखण्यासाठी सेनापती अर्थात पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी लढण्यास हिरवा कंदील दाखविला होता; पण आज पुण्यात बारामती हॉस्टेलवर झालेल्या बैठकीत पवारांनी माढ्याच्या रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनाच लढत द्यावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यांची उमेदवारी येत्या दोन दिवसात जाहीर होईल, असे राष्टÑवादीच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मोहिते-पाटील विरोधक असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना माढ्यातून उमेदवारी देणे योग्य होईल, अशी भाजपमध्ये चर्चा सुरू आहे.माढ्यातील राष्टÑवादीअंतर्गत राजकारणात मोहिते-पाटील यांना गेल्या तीन-चार वर्षांपासून शह देण्यात येत आहे. या स्थितीत हा गड राखणे राष्टÑवादीसाठी महत्त्वाचे होते. त्यामुळे दीड महिन्यापूर्वी पुण्यातच झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील नेत्यांनी माढ्यातून लढण्यासाठी पवारांना आग्रह केला होता. त्यानंतर आठवडाभरातच पवार माढा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले. एका सभेत उपस्थित जनसमुदायाने त्यांना माढ्यात पुन्हा लढण्याची साद घातली. ‘तुमचा होकार असेल, तर मी नाही का म्हणू?’ असा प्रश्न विचारत पवारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला अन् नक्की मानलं गेलं की, माढ्यातून पवारच लढणार! पवार त्यानंतरही माढ्याच्या दौऱ्यावर आले. फलटणला सभा घेतली; पण त्यावेळी त्यांना पक्षांतर्गत धुसफूस दिसून आली अन् पवार कदाचित लढणार नाहीत, असे राष्टÑवादी समर्थकांमधूनसंकेत मिळू लागले. आज सकाळी बारामती हॉस्टेलवर झालेल्या बैठकीत मात्र पवारांनी निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचेस्पष्ट केले.या बैठकीस खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार बबनराव शिंदे, कल्याणराव काळे, आमदार भारत भालके आणि रश्मी बागल-कोलते उपस्थित होते. नजीकच्या समर्थकांनी तर विजयदादाच उमेदवार असल्याचे खात्रीदायकरित्या सांगितले. अर्थात याबाबतचा निर्णय आज सायंकाळी आणि उद्या होणाºया बैठकीत घेतला जाणार आहे. त्यानंतर जाहीर होणाºया उमेदवारांच्या यादीद्वारे विजयदादांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल, असेही सांगण्यात आले.भाजपाचा संजय शिंदे यांना आग्रहमाढ्यात पवार लढणार असतील तर सहकारमंत्री सुभाष देशमुख पारंपरिकपणे त्यांना आव्हान देणार होते; पण विजयसिंह मोहिते-पाटील यांना राष्टÑवादी उमेदवारी देणार असल्याचे संकेत मिळाले असल्याने या स्थितीत त्यांचे राजकीय विरोधक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि ज्थयांना उमेदवारी घेण्यासाठी भाजप आग्रह करीत असल्याचे सूत्राने सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Vijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलSharad Pawarशरद पवार