शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 20:35 IST

Third Alliance in Maharashtra News: बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांनी एकत्र येत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीने काही मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत.

नितीन काळेल, सातारा  Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी ‘परिवर्तन महाशक्ती’ने (Third Alliance in Maharashtra) तयारी केली असून, मंगळवारी साताऱ्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये जिल्ह्यातील सर्व आठ मतदारसंघ लढविण्याची भूमिका घेण्यात आली. तसेच या बैठकीत अनेकांनी उमेदवारीची मागणीही केली. पण, वरिष्ठ स्तरावरुन उमेदवारी जाहीर होईल त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. Third Alliance in Maharashtra Latest News)

सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडी तसेच महायुतीचे उमेदवार उभे राहणार आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही आतापर्यंत तीन मतदारसंघातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले आहे. अशातच आता ‘परिवर्तन महाशक्ती’ही सक्रीय झाली आहे. 

परिवर्तन महाशक्ती... तिसऱ्या आघाडीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

या संघटनेची बैठक मंगळवारी साताऱ्यात पार पडली. या बैठकीला प्रहार जनशक्ती संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वराज्य पक्ष, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आदींचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

साताऱ्यातील ही बैठक सुमारे दोन तासांहून अधिक काळ चालली आहे. यामध्ये सर्वच संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मते मांडली. जिल्ह्यातील सर्वच आठ मतदारसंघात उमेदवार देण्याबाबत निश्चय करण्यात आला. 

यानिमित्ताने आठही मतदारसंघात अनेकांनी उमेदवारी मागितली. तरीही बैठकीतील विषय वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवले जातील. त्याठिकाणी कोणाचीही उमेदवारी जाहीर झालीतरी सर्वांनी संबंधिताच्या पाठिशी ठामपणे आणि एकदिलाने उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला. त्यामुळे ‘परिवर्तन महाशक्ती’ जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

महिलांकडूनही उमेदवारीची मागणी...

साताऱ्यातील बैठकीत अनेकांनी उमेदवारी देण्याची मागणी केली. यामध्ये काही सेवानिवृत्त शिक्षक, प्राध्यापक होते. तसेच महिलांनीही ‘परिवर्तन महाशक्ती’च्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली. संघटनेने महिलांनाही उमेदवारी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहारचे अधिक उमेदवार रिंगणात राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Bacchu Kaduबच्चू कडूRaju Shettyराजू शेट्टीSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती