शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्मिला मातोंडकर यांच्या बोरिवलीतील प्रचार फेरीत भाजपची हुल्लडबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 05:40 IST

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारार्थ सोमवारी बोरीवली पश्चिम विभागात रॅली काढण्यात आली होती.

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारार्थ सोमवारी बोरीवली पश्चिम विभागात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान भाजपचे झेंडे खांद्यावर घेतलेल्या तरुणांनी हुल्लडबाजी केली. तरुणांनी विकृत हावभाव करीत ‘मोदी’ यांच्या नावाच्या घोषणाही दिल्या. या सर्व प्रकारामुळे पुरते गोंधळून गेलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी ऊर्मिला मातोंडकर यांनी बोरीवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.बोरीवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी काही लोक भाजपचे झेंडे घेऊन त्या ठिकाणी आले. त्यांनी फेरीत सहभागी झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. या फेरीत सहभागी असलेले गोराईचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, १५ ते २० तरुणांचा एक घोळका घटनास्थळी आला. त्यांनी ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यातील काही लोकांनी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडे पाहत विकृत हावभाव केले, असेही शेट्टी यांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. या धक्काबुक्कीत एक प्रवासी महिला खाली पडून किरकोळ जखमी झाली.या प्रकरणी ऊर्मिला मातोंडकर यांनी निवडणूक अधिकारी आणि बोरीवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. माझ्या प्रचारफेरीदरम्यान २५ ते ३० गुंडांनी भाजपचा झेंडा घेत महिलांच्या दिशेने पाहत विकृत हावभाव केले. घडलेल्या या प्रकारामुळे मला मानसिक त्रास झाला. परिणामी, सर्व प्रचारफेऱ्या आणि बैठकीसाठी मला पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे, असे बोरीवली पोलिसांना दिलेल्या लेखी पत्रात ऊर्मिला यांनी म्हटले आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बोरीवली पोलीस त्यानुसार घटनास्थळीचे सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळून पाहत असून, या प्रकरणी चौकशी सुरू आहे.>‘आचारसंहितेचे उल्लंघन होते आहे’हे काही पहिल्यांदा झाले नाही. माझ्या धर्मावर, माझ्या नावावर, माझ्या खासगी आयुष्यावर टीका करण्यात आली आहे. ज्यांनी गोंधळ घातला ते सर्वसामान्य नागरिक नव्हते. आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. भाजप कार्यकर्ते आम्हाला धमकावत आहेत. घाबरवत आहेत. माझ्यासह माझ्या महिला सहकारी वर्गाच्या सुरक्षेसाठी पोलीस तक्रार दाखल करावी लागत आहे. आपल्याला आपली लोकशाही वाचवायची आहे.- ऊर्मिला मातोंडकर,काँग्रेस उमेदवार, उत्तर मुंबई>छुपे हल्ले करून निवडणूक लढवू नकाबोरीवलीतील घटनेचा निषेध आहे. पोलिसांनी घडलेल्या घटनेची दखल घेत गुन्हेगारांवर योग्य कारवाई करावी. जसा काँग्रेसला त्यांचा प्रचार करण्याचा अधिकार आहे; तसा भाजपला त्यांचा प्रचार करण्याचा अधिकर आहे. जनतेलाही त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यासाठी हल्ला करणे योग्य नाही. आणि काँग्रेसची एक जुनी सवय आहे. आपणच करायचे आणि दुसºयावर आरोप करायचे. दंगल स्वत: करायची आणि आरोप दुसºयावर लावायचे. हिंमत असेल तर कामाच्या बळावर, मेरिटवर निवडणूक लढवावी. छुपे हल्ले करून निवडणूक लढवू नका. आता डिपॉझिट वाचणार नाही हे काँग्रेसच्या लक्षात आले आहे. परिणामी, अशी कृत्ये करत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न आहे.- गोपाळ शेट्टी, भाजप उमेदवार, उत्तर मुंबई

टॅग्स :Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019mumbai-north-pcमुंबई उत्तर