शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
3
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
4
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
5
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
6
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
7
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
8
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
9
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
10
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
11
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
12
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

बंगालची वाघिण, यापूर्वी अशी ताकत पाहिलेली नाही!, ममतांवरील हल्ल्यावरून उर्मिला मातोंडकरांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 2:05 PM

Urmila Matondkar reaction on Mamata Banerjee : बंगालची वाघिण लवकरात लवकर तंदुरुस्त होईल आणि पुन्हा एकदा राजकीय मैदानात उतरेल असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देउर्मिला मातोंडकर यांनी ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयातील एक फोटो ट्विट करुन त्यांच्याबाबत काळजी व्यक्त केली आहे.

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. या हल्ल्यावर अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila matondkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बंगालची वाघिण लवकरात लवकर तंदुरुस्त होईल आणि पुन्हा एकदा राजकीय मैदानात उतरेल असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे. (Urmila Matondkar reaction on West Bengal Chief Minister Mamata Banerjee alleged an attack)

यासंदर्भात उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट केले आहे. यामध्ये उर्मिला मातोंडकर यांनी ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयातील एक फोटो ट्विट करुन त्यांच्याबाबत काळजी व्यक्त केली आहे. "जी गोष्ट तुम्हाला तोडू शकत नाही, ती तुम्हाला आणखी मजबूत करते. अशी ताकत आम्ही यापूर्वी पाहिलेली नाही. बंगालची वाघिण लवकरात लवकर तंदुरुस्त होईल. ममतादीदी तुम्ही पुन्हा मैदानात कधी उतराल याची आम्ही वाट पाहात आहोत," असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सध्या ममता बॅनर्जी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ममता बॅनर्जी  यांच्या पायाचा एक्सरे काढण्यात आला असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने प्लॅस्टर घालण्यात आल्याचे एसएसकेएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. तर, ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयामधील फोटो ट्विट करत भाजपाला इशारा दिला आहे. भाजपाने तयार रहावे. रविवारी 2 मे रोजी त्यांना बंगालच्या लोकांची ताकद दिसणार आहे. तयार राहा, असे त्यांनी म्हटले आहे. 

( ममता बॅनर्जींच्या पायाला प्लॅस्टर; हल्ल्याप्रकरणी TMC निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार )

ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला कसा झाला?या निवडणुकीच्या रणधुमाळीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल नंदीग्राम मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. यानंतर ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे एका मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. मंदिरातून बाहेर परतल्यानंतर त्या गाडीत बसण्यासाठी जात होत्या. यावेळी त्या गाडीत शिरत नाही, तोवर चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी, ममता बॅनर्जी यांना गंभीर दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या डाव्या पायाला प्लॅस्टर करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालची निवडणूक हायव्होल्टेज ठरणार दरम्यान, देशात पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. परंतू सर्वात हायव्होल्टेज निवडणूक ही पश्चिम बंगालची ठरणार आहे. याठिकाणी भाजपाला काहीही करून पश्चिम बंगालची सत्ता मिळवायची आहे, तर तृणमूल काँग्रेसला काहीही करून सत्ता टिकवायची आहे. यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.

टॅग्स :Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरMamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Politicsराजकारणtmcठाणे महापालिकाShiv Senaशिवसेना