शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मावळमध्ये शहरी मतदारांचा कौल महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 23:42 IST

मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, पनवेल आणि कर्जत हा शहरी भाग आहे.

- विश्वास मोरे पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, पनवेल आणि कर्जत हा शहरी भाग आहे. त्या ठिकाणी नवीन मतदार नोंदणीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.मावळ लोकसभेत शहरी भागाचे मतदान अधिक असल्याने मतदारांचा कौल मिळावा यासाठी दोन्ही उमेदवारांची स्पर्धा लागली आहे. मागील निवडणुकीत चिंचवड, पिंपरी आणि पनवेलमधून प्रथम स्थानावर शिवसेना, द्वितीय स्थानावर शेकाप आणि तृतीय स्थानावर राष्टÑवादी काँग्रेस होती.शहरी मतदारांवरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असून पनवेल विधानसभा मतदार संघात सध्या प्रमुख पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे.मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, पनवेल, कर्जत, लोणावळा, तळेगाव अशी प्रमुख शहरे आहेत. २०१४ च्या निवडणुकीत १७ लाखपैैकी ११ लाख ७२ हजार ८४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक ५ लाख १२ हजार २२६ मते श्रीरंग बारणे यांना, ३ लाख ५४ हजार ८२९ मते लक्ष्मण जगताप यांना, तर नार्वेकर यांना १ लाख ८२ हजार २९३ मते मिळाली होती. त्यांपैैकी शहरी मतदानाचा आढावा घेतला असता, शिवसेना-भाजपा युतीला ३ लाख ६९ हजार ७४० मते, शेकापला ३ लाख ३१ हजार ६२५ मते, राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला १ लाख १८ हजार ९५५ मते मिळाली होती.शहरी भागात युतीला अधिक मतदान मिळाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर या मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपला मतदार टिकवून ठेवल्याचे दिसते.चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदार संघात भाजपाचे ५१ नगरसेवक आहेत, तर शिवसेनेचे ९, राष्टÑवादी काँग्रेसचे २२ नगरसेवक आहेत. चिंचवड, मावळ, पनवेल येथे भाजपाचे आमदार असून, पिंपरी आणि उरणमध्ये शिवसेनेचा आमदार आहे. कर्जतमध्ये राष्टÑवादी काँग्रेसचा आमदार आहे. शहरांची तुलना केल्यास मावळ, पिंपरी, चिंचवड, पनवेल, उरण या पाचही ठिकाणी युतीची ताकत आहे. तसेच तळेगाव दाभाडे शहरात एकूण २७ नगरसेवकांपैकी भाजपाचे पंधरा, शहर सुधारणा समितीचे सहा आणि जनसेवा विकास समितीचे सहा असे पक्षीय बलाबल आहे. लोणावळ्यात २९पैकी १० भाजपा, काँग्रेस सात, आरपीआय एक, अपक्ष चार असे पक्षीय बलाबल आहे. अपक्षांपैकी दोघेजण मूळ राष्टÑवादीचे आणि दोन भाजपाचे आहेत. उमेदवारांमध्ये सर्वाधिक स्पर्धा शहरी मतदारांची पसंती मिळविण्यासाठी असल्याचे प्रचार यंत्रणेवरून दिसत आहे.>पनवेल, पिंपरी, चिंचवड मावळमध्ये अव्वलशहरी भागातील तीन मतदारसंघांत महायुतीचे प्राबल्य आहे. तसेच या मतदारसंघांत नवमतदारांची संख्या वाढली आहे. चिंचवडमध्ये ११ हजार ८५९, पनवेलमध्ये ९ हजार १४७, पिंपरीत ५ हजार १८१ नवमतदार आहेत.शहरी भागाबरोबर युवकांचा वाढलेल्या मतांचा टक्का कोणासाठी फायद्याचा ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मावळ लोकसभेतील नवमतदारांचा कोैल निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे.>शहरात महायुतीचे, ग्रामीण भागात महाआघाडीचे प्राबल्यसन २०१४च्या निवडणुकीत शेकाप वेगळी लढली होती. या वेळी ही ताकद राष्टÑवादी काँग्रेसबरोबर आहे. घाटाखालील तीन मतदारसंघांतील ताकद तीन पक्षात विखुरली होती. ती आता दोन उमेदवारामध्ये विभागली जाणार आहे.पिंपरी-चिंचवड आणि पनवेल या सर्वाधिक मतदार असलेल्या महापालिका भाजपाच्याच ताब्यात आहेत. त्या खालोखाल ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, शेकाप अशी ताकद आहे.>शहर शिवसेना राष्टÑवादी शेकापचिंचवड १,३७,७७२ १४,५२० ७३,५२९पिंपरी ९५,८८९ २१०७१ ३८३५९पनवेल ६९९७९ ४२६६१ ८१३२१कर्जत ६६१०० ४०७०३ ३८४१६एकूण ३,६९,७४० १,१८,९५५ २,३१,६२५>२०१९ ला मतदार४,७६,७८०३,४१,७०१५,१४,९०२२,७५,४८०१५,७८,८६३

टॅग्स :maval-pcमावळMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019