शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उदित राज अखेर कॉँग्रेसमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 03:55 IST

उमेदवारी नाकारल्याने होते नाराज

नवी दिल्ली : भाजपचे खासदार व दलित समाजाचे नेते उदित राज यांनी बुधवारी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपने उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघातून त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. उदित राज यांच्याऐवजी भाजपने पंजाबी प्रख्यात गायक हंस राज हंस यांना उमेदवारी दिली. भाजपने उमेदवारी नाकारल्याने उदित राज यांनी मंगळवारीच आपल्या ‘व्टिटर हँडल’वरुन नावासमोरील चौकीदार हा शब्द हटविला होता.त्यांनी आपली पक्षाविषयीची नाराजीही जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी उदित राज यांनी कॉँग्रेस मुख्यालयाचा रस्ता धरला. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉँग्रेसचे सदस्यत्व मिळताच त्यांनी भाजपवर हल्ला चढविला. आपले तिकिट कोणत्या आधारावर कापले गेले हे समोर आले पाहिजे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर डोळे झाकून विश्वास ठेवला. ‘इंडियन जस्टिस पार्टी’ हा स्वत:चा पक्ष भाजप मध्ये विलीन केला. मात्र ‘अपना दल’सारखे छोटे पक्ष आपल्यापेक्षा अधिक फायद्यात राहिले. मला भाजपचा दलित चेहरा म्हणून प्रसिध्दी दिली जात असे. दलितांच्या हक्कासाठी आपण आवाज उठवित राहिलो.याची शिक्षा तर नव्हे?‘एस.सी’, ‘एस.टी’ कायदा आणि ‘रोस्टर पॉइंट’ या मुद्यांवर दलितांनी आयोजिलेल्या ‘भारत बंद’ला आपण पाठिंबा दिला होता. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश मिळण्याची मागणीही आपण लावून धरली. दलित आणि महिलांच्या हक्कांबद्दल आवाज उठविण्याची शिक्षा तर मला भाजपने दिली नाही ना? हे पक्षनेतृत्वाने स्पष्ट केले पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस