शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

मावळमधील दादागिरी मोडून काढू- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 1:22 AM

काळेवाडी येथील महायुतीच्या सभेत बारामतीची भानामती आता चालणार नाही असे टीकास्त्र

पिंपरी : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीचे हजारो लोक आलेत, ते येऊ द्यात. बारामतीची भानामती आता चालणार नाही. मावळ ही मावळ्यांची भूमी आहे. मावळचा गोळीबार कोणी केला? हे सर्वांना माहीत आहे. मावळ्याला मत द्यायचे की मावळचा गोळीबार करणाऱ्याला द्यायचे हे ठरवायला हवे. मावळमध्ये कोणतीही दादागिरी सहन केली जाणार नाही. गुंडगिरी मोडून काढू, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळेवाडीत केली. काळेवाडी फाट्यावरील मैदानात भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर राज्यमंत्री विजय शिवतारे खासदार, अमर साबळे, संपर्क प्रमुख डॉ. नीलम गोºहे, शिवसेना नेते संजय राऊत, भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, बाळा भेगडे, रवींद्र मिर्लेकर, पिंपरी-चिंचवड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, राज्य संघटक गोविंद घोळवे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महापालिका सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, शिवसेना गटनेते राहुल कलाटे आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात भगवे तुफान सुरू आहे. युतीपूर्वी विरोधक लाकडाची होडी घेऊन दिल्लीकडे निघाले होते. आता त्यांची अवस्था केवीलवाणी झाली आहे. निकाल येण्यापूर्वीच ते ईव्हीएमवर खापर फोडू लागले आहेत. पराभव मान्य केला आहे. अनेक वर्षे संपूर्ण देशात दरोडेखोर होते. दरोडेखोरांचे राज्य आपण उद्ध्वस्त केले. बकासुराच्या हाती सत्ता द्यायची हे ठरविण्याची निवडणूक आहे.’’देशावर हिंदुत्वाचा तेजस्वी झेंडा फडकवण्यासाठी ही निवडणूक आहे. मावळ्यांची भूमी आहे. काही वर्षांपासून मावळची भूमी डाकूची भूमी झाली आहे, तिला दरोडेखोरांच्या जाचातून मुक्त करायचे आहे. कायदा सुव्यवस्था समतेसाठी मोदी यांना निवडून द्यायचे आहे. बारामतीचे नट बोल्ट सुटे केले आम्ही ते कुठे पाठवायचे ठरवू.- संजय राऊत, शिवसेना नेतेकोणतीही राजकीय परंपरा नसताना सर्वसाधारण कार्यकर्ते यास काम करण्याची संधी शिवसेना प्रमुखांनी दिली. रेल्वे, स्मार्ट सिटी, मेट्रो, चापेकर बंधूचे टपाल तिकीट, माथेरान रेल्वे, पासपोर्ट कार्यालय सुरू केले. विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न, यासाठी पाठपुरावा करीत आहे. विरोधकाकडे कोणताही विषय नाही. केवळ टीकाच करू शकतात.- श्रीरंग बारणे, खासदारमाजी खासदार गजानन बाबर स्वगृही परतलेमावळ लोकसभा मतदारसंघाचे पहिले शिवसेना खासदार गजानन बाबर हे पुन्हा स्वगृही परतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भगवा ध्वज आणि उपरणे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. २०१४ मध्ये तिकीट नाकारल्यानंतर बाबर यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बाबर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत असताना बाबर यांनी सलग तीनदा नगरसेवक, दोनदा आमदार आणि एकदा खासदारकी शिवसेनेकडून भूषविली होती़आमचं ठरलंय : आमचं ठरलंय, या वाक्याचा आधार घेऊन ठाकरे म्हणाले, ‘‘देशद्रोह्यांना फाशी द्यायची, पाकिस्तानने आगळीक केल्यावर त्याचे कंबरडे मोडायचे, मोदींना पंतप्रधान करायचं आहे. बारामती आणि मावळमध्ये एकाच घरातील सगळे उभे आहेत, त्यांनाही घरी बसवायचं, हेही आमचे ठरलंय.’’पवारांचे पाडापाडीचे राजकारणशरद पवार यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले,‘‘पवारांनी आजपर्यंत पाडापाडीचेच राजकारण केले आहे. १३ दिवसांचे १३ महिन्यांचे सरकार कोणी पडले? ’’

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळUddhav Thackerayउद्धव ठाकरे