शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'राफेलमध्ये दिलेले हजारो कोटी अंबानीकडून काढून घेऊन गरिबांना देऊ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 05:11 IST

काँग्रेस पक्ष सत्य, न्याय, प्रेम आणि बंधुभाव यासाठी ही निवडणूक लढवत आहे तर असत्य, अन्याय, विद्वेष आणि खोटेपणा हेच भाजपचे धोरण आहे.

दादा जनवाडे निपाणी (जि. बेळगाव) : काँग्रेस पक्ष सत्य, न्याय, प्रेम आणि बंधुभाव यासाठी ही निवडणूक लढवत आहे तर असत्य, अन्याय, विद्वेष आणि खोटेपणा हेच भाजपचे धोरण आहे. त्यामुळे सत्य व न्याय हवा की विद्वेष , खोटेपणा हे ठरवून मतदान करा असे आवाहन कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केले. पंतप्रधान मोदी हे अनिल अंबानीचे चौकीदार आहेत. कॉँग्रेस सत्तेवर आल्यास राफेल सौद्यात देण्यात आलेले हजारो कोटी अनिल अंबानी यांच्याकडून काढून घेवून शेतकरी व गरीब लोकांना देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.चिक्कोडी येथे कॉँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, असे सांगितले तर ते याला तयार होत नाहीत; पण अनेक उद्योगपतींची कर्जे त्यांनी माफ केली आहेत.आज ते कृषी क्षेत्रावर व शेतकऱ्यांवर बोलत असले तरी आमच्याच पक्षाच्या कर्नाटक सरकारने शेतकºयांना ४० हजार कोटींची कर्जमाफी दिली. आमच्याच कर्नाटकातील सरकारने उसाला चांगला दर मिळवून दिला. देशातील जनतेला पंधरा लाख देऊ असे सांगून मोदींनी फसवणूक केली; पण काँग्रेसचे सरकार येताच देशातील ५ कोटी महिलांच्या खात्यावर प्रतिवर्षी ७२ हजार रुपये जमा करणार आहे आणि ही केवळ घोषणा नसून हे सत्यात उतरणार आहे. कारण हा निर्णय आम्ही अभ्यास करून घेतला आहे.>‘गुरुंना उमेदवारी नाकारणे ही मोदींची संस्कृती’राहुल गांधी म्हणाले, मोदी हे नेहमी धर्म व संस्कृती याबद्दल बोलत असतात. आपल्या संस्कृतीत गुरुला खूप महत्त्व आहे; पण मोदींनी आपले गुरू लालकृष्ण अडवाणी यांनाच उमेदवारी नाकारून वेगळीच संस्कृती दाखवली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRafale Dealराफेल डील