शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तिसरा टप्पा: ३९२ उमेदवार कोट्यधीश, ११ जणांची मालमत्ता शून्य; २३ अंगठेबहाद्दर, ७८८ पाचवी ते बारावी शिकलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 03:33 IST

१८३ उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेली नाही पॅनकार्डची माहिती

नवी दिल्ली : निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये २५ टक्के उमेदवार करोडपती असून ज्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही असे ११ उमेदवारही रिंगणात आहेत. एकूण ३९२ उमेदवार करोडपती असून त्यात समाजवादी पार्टीचे ९ (९० टक्के), भाजपचे ८४ टक्के, कॉँग्रेसचे ८२ टक्के उमेदवार आहेत. राष्टÑवादी कॉँग्रेसचे ७०%, माकपाचे ५३ %, सेनेचे ४१ % तर बसपाचे १३ % कोट्यधीश आहेत. उमेदवारांची सरासरी मालमत्ता २.९५ कोटी आहे.बहुजन मुक्ती पार्टीचे जे. पी. लडाकभाई, भारतीय ट्रायबल पार्टीचे बी. वन्साभाई खुलत, नवसर्जन भारत पार्टीचे एच. आर भानाभाई, भारतीय पीपल्स पार्टीचे शंकर जाधव यांच्यासह अन्य सात अपक्षांनी आपल्याकडे शून्य मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.उत्तर प्रदेशमधील सपाचे उमेदवार देवेंद्र सिंह यादव यांची मालमत्ता २०४ कोटी असून ती या टप्प्यातील सर्वाधिक आहे. यापाठोपाठ राष्टÑवादीचे साताºयामधील उमेदवार उदयनराजे भोसले (१९९ कोटी) व बरेलीचे कॉँग्रेस उमेदवार प्रवीण सिंह आरोन (१४७ कोटी) हे कोट्यधीश आहेत. १८३ उमेदवारांनी पॅनकार्डची माहिती दिलेली नाही. असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने तिसºया टप्प्यात होत असलेल्या ११७ मतदारसंघांतील १६०० उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करून हा अहवाल जारी केला आहे.२३ अंगठेबहाद्दर२३ अंगठेबहाद्दर उमेदवारही आहेत. ४९% (७८८) उमेदवारांचे शिक्षण पाचवी ते १२वी दरम्यान आहे तर ४३% (६७१) उमेदवार हे पदवीपर्यंत शिकलेले आहेत. या टप्प्यातील सर्वाधिक ७६० (४८%) उमेदवार हे ४१ ते ६० वयोगटातील असून त्याखालोखाल ३५% (५६२) उमेदवार २५ ते ४० वयोगटातील आहेत. १७% (२६५) उमेदवार ६१ ते ८० वयोगटातले असून तीन उमेदवारांचे वय ८० वर्षांहून अधिक आहेत. चार उमेदवारांनी आपले वय नमूद केलेले नाही.230 उमेदवारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे आहेत. ३० जणांविरुद्ध खुनाचे, १४ जणांविरुद्ध अपहरणाचे तर २९ उमेदवारांच्या विरोधात महिलांबाबतच्या अत्याचाराचे गुन्हे आहेत.63 मतदारसंघ हे संवेदनशील आहेत. ज्या मतदारसंघामध्ये तीन किंवा त्याहून जास्त उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात असे मतदारसंघ संवेदनशील मानले जातात.तिसºया टप्प्यातील जागांचा आढावाआसाम : ४एआययूडीएफ :डुबरी, बारपेटाअपक्ष : कोकराझारभाजप : गुवाहाटीओडिशा : ६बिजद : पुरी, भुवनेश्वर, कटक, धेनकनाल, संबलपूर, केनझाल.बिहार : ५भाजप : झांजरपूरकॉँग्रेस : सुपौलराजद : अरारिया, माधेपुरालोजसपा : खगरियाछत्तीसगड : ७भाजप : कोरबा, सरगुजा, बिलासपूर, रायपूर, रायगढ, झांजगिर : चंपा,कॉँग्रेस : दुर्गगुजरात : २६भाजप : कच्छ, बनासकांठा,पाटण, मेहसाणा, साबरकांटा, गांधीनगरअहमदाबाद (पूर्व), अहमदाबाद (पश्चिम), सुरेंद्रनगर, राजकोट, पोरबंदर, जामनगर, जुनागड, अमरेली, भावनगर, आणंद, खेडा, पंचमहाल, दाहोद, वडोदरा, छोटा उदयपूर, भरूच. बारडोली, सुरत, नवसारी, बलसाडगोवा : २भाजप : उत्तर गोवा, दक्षिण गोवाजम्मू-काश्मीर : १पीडीपी : अनंतनागकर्नाटक : १४भाजप : बागलकोट, बेळगाव, विजापूर, बिदर, कोप्पळ, दावणगेरे, शिमोगाकॉँग्रेस : चिक्कोडी, गुलबर्गा, रायचूर, बेल्लारी, हावेरी, धारवाड, उत्तर कन्नडकेरळ : २०कॉँग्रेस : अळपुळा अर्नाकुलम, कोळीकोड मावेलीक्कारा, पटणमतिट्टा, तिरुअनंतपूरम, वडक्कडा,वायनाडमाकपा : अलाथूर, अतिंगल, कन्नूर, कासारगोड, पलक्कडभाकप : त्रिसूरआरएसपी : कोल्लममुस्लीम लीग : पोन्नानी, मल्लापूरमअपक्ष : चलकुडी, इडुक्कीअन्य : कोट्टायमत्रिपुरा : १माकपा : त्रिपुरा पूर्वउत्तर प्रदेश : १०भाजप : मोरादाबाद, रामपूर, पिलभित, बरेली, आयोना, बदाऊन, संबल, इटाहसपा : मैनपुरी, फिरोजाबादप. बंगाल : ५तृणमूल कॉँग्रेस : बालूरघाटकॉँग्रेस : जांगीपूर, माल्डा उत्तर, माल्डा दक्षिणमाकपा : मुर्शिदाबाददादरा नगरहवेली : १भाजप :दादरा नगर हवेलीदमण-दीव : १भाजप : दमण-दीवतिसºया टप्प्यात गाजलेले मुद्देया टप्प्यातही निवडणूक आयोगाने साध्वी प्रज्ञासिंह, मिलिंद देवरा, मुख्तार अब्बास नक्वी आदींच्या विरोधात आचारसंहिता भंगाच्या नोटीस जारी केल्या.प्रचारादरम्यान, भाजपचे भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दलचे आणि बाबरी मशीद पाडल्याचे वक्तव्य वादग्रस्त ठरले. त्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.हार्दिक पटेल यांच्यावर सभेत एका व्यक्तीने कानशिलात मारली तर नोटाबंदीवरून भाजप नेत्यावर जोडा फेकण्यात आला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक