शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Tamilnadu Assemlbly Election: प्रचाराची रणधुमाळी असणार केवळ तेरा दिवस; ६६६५ उमेदवारी अर्ज, बहुरंगी लढती होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 6:33 AM

द्रविड मुन्नेत्र कळघम आघाडी आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आघाडी यांच्यातच प्रमुख लढत आहे

वसंत भोसले चेन्नई : तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकांचे चित्र सोमवारी स्पष्ट होत आहे. त्यानंतर केवळ तेरा दिवसांच्या प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. कालअखेरच्या दिवसापर्यंत ६ हजार ६६५ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्यामध्ये ९८६ महिलांच्या अर्जांचा तर तीन तृतीयपंथींच्या अर्जांचा समावेश आहे. कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूकही होत असून तेथे बावीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असले तरी सोमवारी माघारीचा एकच दिवस आहे, शिवाय छाननी तसेच माघार घेण्याची मुदत संपताच चित्र स्पष्ट होईल. बहुसंख्य मतदारसंघांत बहुरंगी लढती अपेक्षित आहेत. 

द्रविड मुन्नेत्र कळघम आघाडी आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आघाडी यांच्यातच प्रमुख लढत आहे. शिवाय नव्यानेच राजकारणात उतरलेल्या अभिनेता कमल हसन यांच्या नेवृत्वाखालील पक्षाची सत्त्वपरीक्षा ठरणार आहे. सर्वाधिक ९५ उमेदवारी अर्ज करूर  मतदारसंघात दाखल झाले आहेत. सेलम जिल्ह्यातील ईडाप्पडी मतदारसंघात मुख्यमंत्री ई.के. पलानीस्वामी यांच्यासह ३८ अर्ज दाखल झाले आहेत. 

उद्या चित्र स्पष्ट होणार सर्व प्रमुख पक्षांनी प्रचार सुरू केलेला असला तरी सोमवारी चित्र स्पष्ट झाल्यावर प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. २३ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान केवळ तेरा दिवस प्रचाराला मिळणार आहेत आणि  ६ एप्रिल रोजी संपूर्ण राज्यात तसेच कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. मतमोजणी दि. २ मे रोजी होणार आहे. अण्णा द्रमुकची भाजपशी तर द्रमुकची काँग्रेस तसेच डाव्या पक्षांशी आघाडी आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूElectionनिवडणूक