शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह राज्यात काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल; प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय लवकरच होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 06:46 IST

राज्यात काँग्रेससाठी काम करणारे सगळेच नेते माझ्यासाठी खास आहेत. महाराष्ट्रात कुठलीही गटबाजी आपण चालवू देणार नाही, असेही नवे प्रभारी हनुमंतगौडा कृष्णेगौडा ऊर्फ एच.के. पाटील यांनी स्पष्ट केले.

अतुल कुलकर्णी मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय लवकरच घेतला जाणार असून मुंबई काँग्रेसमध्येही येत्या एकदोन महिन्यांत मोठे फेरबदल दिसतील, अशी माहिती काँग्रेसचे नवे प्रभारी हनुमंतगौडा कृष्णेगौडा ऊर्फ एच.के. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आपण लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत. सगळ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हा दौरा करू, असे सांगून पाटील म्हणाले, मी राहुल गांधी व सोनिया गांधी यांचा खास आहे, असे बोलले जाते. राज्यात काँग्रेससाठी काम करणारे सगळेच नेते माझ्यासाठी खास आहेत. महाराष्ट्रात कुठलीही गटबाजी आपण चालवू देणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बिहारमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला, त्याबद्दल विचारले असता पाटील म्हणाले, पटेल हे मोठे नेते आहेत. ते आमच्या नेत्यांशी थेट बोलू शकतात. त्यांना कोणते मुद्दे अडचणीचे वाटले, मला माहीत नाही. मात्र, बिहार असो की अन्य कुठलेही राज्य, चांगल्या प्रस्तावांचे काँग्रेस नेहमीच स्वागत करेल.

वाचा संपूर्ण मुलाखत - "दहा लाखांचा सूट घालून गांधीजींचे नाव घेणे हाच मुळात विरोधाभास"; काँग्रेस प्रभारींची पंतप्रधानांवर टीका

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राविषयी काँग्रेसची भूमिका काय आहे? असे विचारले असता पाटील म्हणाले, संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने सेक्युलर शब्दावरून जी टिप्पणी केली, ती त्यांना शोभा देत नाही. त्यांनी घटनेने दिलेल्या औचित्याचा भंग केला आहे. घटनेने धर्मनिरपेक्षतेबद्दलच्या दिलेल्या विश्वासार्हतेला राज्यपालांच्या पत्रामुळे धक्का बसला आहे. मुख्यमंत्रीच नाही तर देशातल्या सामान्य माणसानेही धर्मनिरपेक्ष असलेच पाहिजे. त्यामुळे त्यावर अशा महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीने असे विधान करणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आजपर्यंत अन्य कोणत्या राज्यपालांनी अशा पद्धतीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले होते का? असे विचारले असता पाटील म्हणाले, मला यावर अधिक काही बोलायचे नाही.मुंबईत मोठे फेरबदलमुंबई काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल केले जाणार असून या शहरांतही पक्ष मजबूत झालेला दिसेल. मिलिंद देवरा यांच्यासह सर्वांना विश्वासात घेऊन फेरबदल केले जातील, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात