शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार रॅलीत रोज अडीच हजार समोसे होतात फस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:12 IST

ठाणे लोकसभा मतदारसंघात आता प्रचार शिगेला पोहोचला

अजित मांडकेठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात आता प्रचार शिगेला पोहोचला असून या प्रचारात आघाडी घेण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी जीवाचे रान करण्याचे ठरवले आहे; परंतु प्रचारात आघाडी घेताना कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची गरज भासत असते. त्यामुळे रॅलीत सहभागी होणाºया प्रत्येकाला खूश करण्यासाठी विविध पक्षांकडून समोसा, पाण्याच्या बाटल्या आणि जेवणाचा मेनू फिक्स करण्यात आला आहे. त्यानुसार, सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास प्रचार रॅली काढताना रोज २५०० च्या आसपास समोसे फस्त होत असून तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या पत्रावळी उठत आहेत. यामध्ये वाराप्रमाणे व्हेज आणि नॉनव्हेज मेनू निश्चित केला आहे. कुपण घ्या आणि भरपेट खा, अशी स्किमसुद्धा राबवली जात आहे. तर, रोज सहा हजारांच्या आसपास छोट्या पाण्याच्या बाटल्या गटकल्या जात आहेत.ठाणे लोकसभा मतदारसंघात आता २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर, मतदारसंख्या २३ लाख ७० हजार ७४० एवढी आहे. या सर्वच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना शक्य नाही. त्यामुळे रॅली, चौकसभांच्या माध्यमातून या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या सुरूआहे. त्यानुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय प्रचार रॅली, चौकसभांचे आयोजन केले जात आहे. त्यांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी करण्यासाठी विविध पक्षांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सध्या उन्हाचा पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे उन्हातून रॅली काढताना पाण्याची व्यवस्था करण्याचे प्रमुख काम या मंडळींना करावे लागत आहे. त्यानुसार, सकाळच्या सत्रात विविध पक्षांकडून सुमारे चार हजार आणि सायंकाळच्या सत्रात साधारणपणे दोन हजारांच्या आसपास छोट्या पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा केला जात आहे. केवळ पाणीच नाही, तर त्यांच्या नाश्त्याचीसुद्धा सोय केली जात आहे. त्यानुसार, सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास ठाण्यातील रॅलीमध्ये दोन ते अडीच हजार समोसे फस्त होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाण्यातील काही ठरावीक विक्रेत्यांची या निवडणुकीमुळे चांगलीच चंगळ झाली आहे. एका कार्यकर्त्याला दोन याप्रमाणे हे समोसे फस्त होत आहेत. दुपारी काही पदाधिकारी घरी जात असले, तरी काही पदाधिकारी उमेदवाराबरोबरच राहत असल्याने त्यांच्यासाठी जेवणावळीचीसुद्धा सोय करून देण्यात येत आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे