शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

...तर दोन दिवसांत शिवसेना सत्ता सोडून आम्हाला सत्तेत बसविणार आहे का? अविनाश जाधव यांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 19:35 IST

माजी महापौर शिंदे यांनी दोन दिवसांत एकनाथ शिंदे यांना जाधव यांनी उचलून दाखवावे असे आव्हान केले. त्यावर प्रत्युत्तर देताना जाधव म्हणाले की, दोन दिवसात उचलून नेण्याचे आव्हान आम्हाला देत असतील तर शिवसेना या दोन दिवसांत सत्ता सोडत आहे का?

ठाणे - माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केलेल्या आव्हानाला मनसेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रत्युत्तर दिले. जाधव म्हणाले की, येत्या दोन दिवसांत एकनाथ शिंदे यांना उचलून दाखवा अशी भाषा माजी महापौर करत असतील तर दोन दिवसांत शिवसेना सत्ता सोडून आम्हाला सत्तेत बसविणार आहे का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री होणारे का? गेल्या काही दिवसांपासून शिवसेना - मनसे या दोन्ही पक्षांचा सोशल मीडिया वॉर सुरू आहे.दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करीत आहेत. जाधव यांच्यावर शनिवारी शिवसेनेचे खा. राजन विचारे आणि आ. प्रताप सरनाईक यांनी हल्लाबोल केला तर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी जाधव यांच्या टीकेला निदर्शनाच्या माध्यमातून चोख उत्तर दिले. माजी महापौर शिंदे यांनी दोन दिवसांत एकनाथ शिंदे यांना जाधव यांनी उचलून दाखवावे असे आव्हान केले. त्यावर प्रत्युत्तर देताना जाधव म्हणाले की, दोन दिवसात उचलून नेण्याचे आव्हान आम्हाला देत असतील तर शिवसेना या दोन दिवसांत सत्ता सोडत आहे का?मी जे म्हणालो ते सेनेतील हुशार मंडळींनी समजून घेतलेले नाही. ज्यांनी आम्हाला त्रास दिला, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावले त्यांना जेव्हा कधी आम्ही सत्तेत येऊ तेव्हा त्यांना उचलून जेलमध्ये टाकू आणि माझ्या या वक्तव्यावर मी ठाम आहे. मी काय म्हणालो हे जनतेला कळत आहे पण शिवसेनेतील नेत्यांना नीट समजून घ्यायचे नाही. मी 13 ऑगस्ट रोजी सकाळी हे वाक्य बोललो त्यावर प्रतिक्रिया द्यायला शिवसेनेला दोन दिवस का लागले. दोन दिवसात त्यांच्यातील राग तयार होत नव्हता का? त्यांना हे बोलायला कोणीतरी लावत आहे आणि शिवसेना स्वतःचे हसू करून घेत आहे. येत्या दोन दिवसांत उचलून दाखवा असे माजी महापौर म्हणत असतील तर उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांत राजीनामा द्यावा आणि राज यांनी त्यांचा पदभार स्वीकारावा मग आम्ही पुढे करूच सगळे.

टॅग्स :MNSमनसेShiv SenaशिवसेनाthaneठाणेPoliticsराजकारण