शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

उद्धव ठाकरे वाहतूककोंडीत अडकले; शिवसैनिक सभेसाठी तीन तास थांबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 06:55 IST

कल्याणच्या सभेत कार्यकर्त्यांची गर्दी

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी पूर्वेतील चक्कीनाका येथील गुणगोपाळ मैदानात आयोजित केलेल्या सभेला वाहतूककोंडीत अडकल्यामुळे शिवसेनापक्षप्रमुखउद्धव ठाकरे तब्बल पावणेतीन तास उशिराने पोहोचले. मात्र, दुपारी ४ वाजल्यापासून त्यांची वाट पाहणारे शिवसैनिक तसेच भाजप कार्यकर्ते जागेवरून हलले नाही. ठाकरे सभास्थानी येताच जयजयकाराच्या घोषणांनी सारा आसमंत दणाणून सोडला.

सभेच्या ठिकाणी भव्य व्यासपीठ उभारले होते. शिवसैनिकांसह भाजप कार्यकर्त्यांसाठी सुमारे चार हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व खुर्च्या भरल्या होत्या. ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी काहींनी उभे राहणे पसंत केले. सर्वांना ठाकरेंचे भाषण पाहायला आणि ऐकायला मिळावे, म्हणून व्यासपीठाच्या बाजूला दोन, तर मैदानाबाहेर एक मोठा स्क्रीन लावण्यात आला होता.युतीचे कार्यकर्ते दुपारी ४ वाजल्यापासून सभेच्या ठिकाणी बस, रिक्षा, खाजगी वाहने तसेच चालत येत होते. त्यांच्या हातात शिवसेना तसेच भाजपचे झेंडे, गळ्यात पक्षाचे पट्टे, तर काही कार्यकर्त्यांनी हातात धनुष्यबाण घेऊन मैदानात प्रवेश केला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे तब्बल पावणेतीन तास उशिराने म्हणजेच, सायंकाळी पावणेआठच्या सुमारास ठाकरे यांचे आगमन झाले. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे होते.
ठाण्यात ‘फक्त सेना’ या टोप्यांनी वेधले लक्षठाणे : महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर उद्धव ठाकरे यांच्या मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत बरेच शिवसैनिक ‘फक्त शिवसेना’ असे लिहिलेल्या भगव्या रंगाच्या टोप्या परिधान करून आले होते व त्याकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले. व्यासपीठापासून सर्वच ठिकाणी भगवे झेंडे, पताका लावलेल्या व अनेकांनी भगवे शर्ट किंवा साड्या परिधान केल्या होत्या. 

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सभेचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे नेते राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ. संजय केळकर, शहरप्रमुख संदीप लेले आदी उपस्थित होते. प्रारंभी विचारे यांना भाजपच्या काही नगरसेवकांनी विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर या गर्दीत फक्त शिवसेना या टोप्या लक्ष वेधून घेणाºया होत्या. सभास्थानी भाजप, शिवसेना व रिपाइंचे झेंडे लावले होते. व्यासपीठाच्या वरील दोन्ही बाजूंना मोठे स्क्रीन लावले होते. त्यामुळे दूरवरील श्रोत्यांनाही सभा पाहणे सोयीचे झाले होते. ठाकरे यांच्या या सभेची वेळ सव्वासहा वाजताची होती. शिवसैनिक ५ वाजल्यापासून हजर होते, पोलीस सकाळी ८ वाजल्यापासून सुरक्षेकरिता तैनात होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kalyan-pcकल्याणUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना