शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

'ठाकरे सरकार' हे महाराष्ट्राच्या इतिहासातील 'लबाड सरकार'; देवेंद्र फडणवीस कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 19:45 IST

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे सरकार हे लबाड सरकार म्हणून ओळखलं जाणार आहे

महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे सरकार हे लबाड सरकार म्हणून ओळखलं जाणार आहे. राज्यात वीज कनेक्शन तोडण्यावर स्थगितीची घोषणा सरकारनं सभागृहात केली होती आणि आता सरकार त्यासाठी असमर्थ असल्याचं सांगत आहे. राज्याच्या जनतेच्या डोळ्यात सरळसरळ धूळफेक करण्याचं काम ठाकरे सरकारनं केलं आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Thackeray Government lie Government History Maharashtra Says Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. "राज्यात महाविकास आघाडी सरकारची केवळ नौटंकी सुरू आहे. घोषणा करायच्या आणि नंतर त्यावर मागे फिरायचं यातून राज्यातील सामान्य जनता व शेतकरी भरडून निघत आहेत", असं फडणवीस म्हणाले. 

महाविकास आघाडी सरकारनं अधिवेशनातून पळ काढला"राज्याचा विरोधी पक्ष खंबीरपणे आपलं काम करत असून सभागृहात अतिशय महत्वाच्या क्षणी मुख्यमंत्र्यांनी येऊन संबोधित करण्याची गरज होती. पण ते आले नाहीत. या अधिवेशनातून महाविकास आघाडी सरकारनं अक्षरश: पळ काढला", अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. 

सचिन वाझे प्रकरणी सगळे पुरावे एटीएसला देणार"मनसुख हिरेन प्रकरणी माझ्याकडे सीडीआर कसा आला याची सरकारनं खुशाल माझी चौकशी करावी. मी माझ्याजवळचा सीडीआर एटीएसकडे नक्कीच पाठवणार आहे आणि या प्रकरणाचा पाठपुरावा देखील करणार आहे", असं स्पष्ट शब्दांत फडणवीस यांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंची वकीलसचिन वाझे यांच्याविरोधात इतके गंभीर पुरावे असतानाही त्यांना पदावरुन दूर केलं जात नाही आणि खुद्द राज्याचे मुख्यमंत्री त्यांची बाजू घेत आहेत हे अतिशय आश्चर्यकारक आहे. सचिन वाझेंना वकीलाची गरज नाही कारण मुख्यमंत्रीच त्याची वकीली करतायत, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझे