शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Tamilnadu Assembly Elections: एनडीएच्या ३ उमेदवारांचे अर्ज नामंजूर; भाजप आघाडीला धक्का, उच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 06:54 IST

आज होणार सुनावणी, रविवारी दुपारी झालेल्या विशेष सुनावणीत केरळ उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकांवर निवडणूक आयोगाला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे

तिरुअनंतपुरम : भारतीय जनता पक्षाच्या दोन उमेदवारांचे आणि सहयोगी पक्ष एआयएडीएमके उमेदवाराचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर केले. भाजप आघाडीच्या तिघांचे अर्ज नामंजूर केल्याने या आघाडीस धक्का बसला आहे. याविरोधात या उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

रविवारी दुपारी झालेल्या विशेष सुनावणीत केरळ उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकांवर निवडणूक आयोगाला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. उद्या सोमवारी दुपारी १२ वाजता यावर पुढील सुनावणी होईल. एन. हरिदास आणि निवेदिता यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेत न्यायमूर्ती एन. नागेश यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला उद्या प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे. या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शनिवारी छाननीनंतर या दोन उमेदवारांचे अर्ज नामंजूर केले होते.कन्नूर जिल्ह्यातील थॅलेसेरी मतदारसंघात, त्रिशूरमधील गुरुवायूरमध्ये आणि इडुक्की जिल्ह्यातील देवीकुलम या मतदारसंघात नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) उमेदवारांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी नामंजूर केले.

थॅलेसेरीमध्ये भाजपने कन्नूरचे जिल्हाध्यक्ष एन. हरिदास यांना उमेदवारी दिली होती. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने या मतदारसंघात २२,१२५ मते मिळविली होती. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची स्वाक्षरी नसल्याचे सांगून हरिदास यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. गुरुवायूरमध्येही एनडीए उमेदवाराचा उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला. येथील उमेदवार, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष निवेदिता यांनी उमेदवारी अर्जात प्रदेशाध्यक्षपदाचे नाव नमूद न केल्यामुळे त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली.

माकपने काय केला आहे आरोप? 

देविकुलममध्ये एआयएडीएमकेचे उमेदवार, केरळमधील एनडीएचे सहयोगी सहकारी धनलक्ष्मी यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला. २६ क्रमांकाचा फॉर्म भरला नाही म्हणून अर्ज नामंजूर करण्यात आला.भाजपचे कन्नूरचे जिल्हाध्यक्ष, थॅलेसेरी मतदारसंघातील उमेदवार एन. हरिदास आणि महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष, त्रिशूरमधील गुरुवायूरच्या उमेदवार निवेदिता सुब्रह्मण्यम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांची उमेदवारी नामंजूर करणे हा भाजप आणि कॉंग्रेसमधील छुप्या कराराचा भाग असल्याचा आरोप माकपने केला आहे. दुसरीकडे, केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी विधानसभेच्या निवडणुकीत माकप आणि भाजपमधील हातमिळवणी समजून घेत उमेदवारी अर्ज फेटाळल्याचा आरोप केला. 

टॅग्स :BJPभाजपाTamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१