शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

Narayan Rane: "नारायण राणेंना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये न्या, वेळ पडल्यास शॉक द्या’’, गुलाबराव पाटील यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 08:33 IST

Narayan Rane: नारायण राणेंच्या अटकेच्या आदेशावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली आहे.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले असून, नाशिकचे पोलीस पथक राणेंना अटक करण्यासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, नारायण राणेंच्या अटकेच्या आदेशावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली आहे. नारायण राणेंना अटक करण्यापेक्षा त्यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे, असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. ("Take Narayan Rane to Thane hospital, give him shock if time permits", Gulabrao Patil)

याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील म्हणाले की, नारायण राणेंची जीभ घसरली असं म्हणण्यापेक्षा त्यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे. एक केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री ज्यांनी ही पदं भुषवलेली आहेत. मुख्यमंत्रिपदाची गरिमा काय असते हे त्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत आपण काय बोलावं, याचं जर त्यांना भान नसेल, तर मला तरी वाटतं की त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे. वेळ पडली तर त्यांना शॉक दिले पाहिजेत.

प्रगतीशील महाराष्ट्र राज्याचे नारायण राणे हे मुख्यमंत्री होते. आदरणीय पवारसाहेब होते. विलासराव देशमुख हेही मुख्यमंत्री होते. तेव्हाही विरोधी पक्ष होता. पण त्यांची एक गरिमा होती. पण आता गरिमा नसलेलं भूत इथं आलेलं आहे. मला तरी वाटतंय की यांच्या अंगामध्ये चुडैल घुसली असावी. त्यामुळे त्यांना भानुमतीच्या भगताकडे नेलं पाहिजे आणि त्यांच्या अंगात काय घुसलंय ते पाहिलं पाहिजे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये राणेंनी चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली.

नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंच्या अटकेचे आदेश काढले. राणे राज्यसभेचे खासदार असल्यानं त्यांच्या अटकेवेळी प्रोटोकॉलचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राणेंना अटक केल्यानंतर त्याबद्दलची माहिती राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना देण्यात येईल. हिंदी किंवा इंग्रजीत ही माहिती त्यांना दिली जाईल.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेना