शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

वीज बिले माफीसाठी पैसा नाही, मग मंत्र्यांची दालने सजवण्यासाठी पैसे कोठून आले? - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 16:48 IST

Raju Shetty Swabimani Shetkari Sanghatna Kolhapur- लॉकडाऊनमुळे वर्षभर आमची मुले शाळा, महाविद्यालयात गेली नसताना, त्यांच्यावर फीची सक्ती केली जाते आणि राज्य सरकार जर बघ्याची भूमिका घेणार असेल, तर ते खपवून घेणार नाही. यासह इंधन दरवाढ, लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफीसाठी लवकरच राज्यभर आंदोलनाचा भडका उडवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. गोरगरिबांची वीज बिले माफीसाठी सरकारकडे पैसा नाही, मग मंत्र्यांची दालने सजवण्यासाठी पैसे कोठून आले? असा सवालही त्यांनी केला.

ठळक मुद्देस्वाभिमानीचा लवकरच राज्यभर आंदोलनाचा भडका - राजू शेट्टीविद्यार्थ्यांना फीची सक्ती, इंधन दरवाढीवर आक्रमक

कोल्हापूर : गोरगरिबांची वीज बिले माफीसाठी सरकारकडे पैसा नाही, मग मंत्र्यांची दालने सजवण्यासाठी पैसे कोठून आले? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला असून इंधन दरवाढ, लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफीसाठी लवकरच राज्यभर आंदोलनाचा भडका उडवू, असा इशारा त्यांनी दिला.

लॉकडाऊनमुळे वर्षभर आमची मुले शाळा, महाविद्यालयात गेली नसताना, त्यांच्यावर फीची सक्ती केली जाते आणि राज्य सरकार जर बघ्याची भूमिका घेणार असेल, तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.धनगर समाजाचे नेते, युवा उद्योजक संदीप कारंडे यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. शेट्टी यांनी त्यांच्या छातीवर संघटनेचा बिल्ला लावून स्वागत केले. त्यावेळी शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. एकीकडे केंद्र सरकार कृषी कायद्याच्या माध्यमातून आम्हाला उद्योगपतींचे गुलाम बनवत आहे, तर दुसरीकडे वीज दरवाढ करून राज्य सरकारने कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करण्यासाठी सहा महिने ओरडतोय. सत्तापिपासू भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीसोबत गेलो, म्हणजे त्यांनी कोणतेही निर्णय घेतले तर ते मान्य करायला आम्ही बांधील नाही.

शिक्षण संस्थाचालकांनी चालविलेल्या फीच्या सक्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी संबंधितांचे कान ओढावेत. मुले महाविद्यालयात नाहीत, शिक्षकांना पगारही नाहीत, मग यांना फी लागते कशाला? लुटायचे तरी किती? आता गप्प बसणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkolhapurकोल्हापूर