नवी दिल्ली : प्रचारात प्रक्षोभक आणि विखारी भाषणे करून निवडणुकीचे नि:ष्पक्ष वातावरण गढूळ करणाऱ्या राजकीय नेत्यांना आवर घालण्यासाठी आम्ही फारसे काही करू शकत नाही, असे सांगणा-या निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ, मायावती यांच्यापाठोपाठ मनेका गांधी व आझम खान या नेत्यांवरही प्रचारबंदी करून दाखविलेल्या कणखरपणावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी समाधान व्यक्त केले.सोमवारी रात्री आयोगाने आझम खान यांच्यावर ७२ तास व मनेका गांधी यांच्यावर ४८ तास प्रचार करण्यास बंदी घातली. हे दोघे निवडणूक लढवत असल्याने त्यांना स्वत:चा प्रचार करणेही शक्य होणार नाही.
आयोगाच्या कारवाईने सुप्रीम कोर्ट समाधानी; मायावतींना दिलासा नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 06:32 IST