शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारला मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही - प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 20:56 IST

Pravin Darekar : हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेले असल्यामुळे त्यांना मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय सरकारकडून घेतले जात असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देमुंबईकरना दररोज वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे ठाकरे सरकारला कधीच समजणे शक्य नाही, कारण ते घरातच बसून असतात अशा शब्दात  प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली. 

मुंबई : मेट्रो कारशेडबाबत सातत्याने निर्णय बदलत वाहतुकीच्या समस्यांनी बेजार झालेल्या मुंबईकरांच्या अडचणीत राज्य सरकारने वाढ केली आहे, असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित असलेल्या आरे येथील मेट्रो कारशेडचा काम हे कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे अंधेरीच्या मेट्रो रेल्वे स्टेशन समोर धिक्कार मोर्चा काढण्यात आला. 800 एकर आरे जंगल वाचविण्याचा दावा जागोजागी होर्डिंग लावून सरकारद्वारे केला जात आहे. मात्र सरकारच्या या दाव्याची पोलखोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच केली आहे. या मोर्चाला संबोधित करताना प्रवीण दरेकर यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली.

हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेले असल्यामुळे त्यांना मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय सरकारकडून घेतले जात असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केले आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, गोरेगावच्या आरे येथील कारशेड प्रकल्प बाबतच्या सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या होत्या व त्यानंतर तो प्रकल्प तिथेच केला जाणार हे नक्की होतं. परंतु ठाकरे सरकारने अहंकाराच्या भावनेतून कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. मुंबईकरांसाठी सर्वाधिक प्राधान्याचा विषय वाहतूक आहे. मुंबईकरना दररोज वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे ठाकरे सरकारला कधीच समजणे शक्य नाही कारण ते घरातच बसून असतात अशा शब्दात  प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली. 

मुंबईकरांच्या या वाहतूक समस्येवर मात करण्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी दिवस-रात्र एक करून या प्रकल्पावर काम केले होते. अरे येथे मेट्रो कार शेडचा निर्णय योग्य असताना देखील  सध्याचे महाविकास आघाडी सरकारने मेट्रो प्रकल्प आधी पहाडी आणि नंतर कांजूरमार्ग च्या कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या जागेवर स्थलांतरित केला. या जमिनीवर असलेली लिटिगेशन सोडवण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो त्यामुळे हा प्रकल्प रेंगाळण्याची शक्यता जास्त आहे, असेही प्रवीण दरेकर म्हणाले. 

टॅग्स :Praveen Darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाAarey ColoneyआरेMumbaiमुंबई