शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

सपा-बसपाचं जागावाटप ठरलं! मोठ्या शहरांतील 14 जागांवर सपा देणार भाजपाला शह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 12:39 IST

समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीची आघाडी झाली आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष बसपापेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.उत्तर प्रदेशातल्या 14 मोठ्या शहरांतील 8 जागांवर समाजवादी पार्टी आणि 6 जागांवर बसपा निवडणूक लढवू शकते. या 14 जागांपैकी तीन जागांवर 2014च्या निवडणुकीत काँग्रेस दोन नंबरवर होती.

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीची आघाडी झाल्यामुळे यंदा राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे. या आघाडीनंतर लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष बसपापेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातल्या 14 मोठ्या शहरांतील 8 जागांवर समाजवादी पार्टी आणि 6 जागांवर बसपा निवडणूक लढवू शकते. या 14 जागांपैकी तीन जागांवर 2014च्या निवडणुकीत काँग्रेस दोन नंबरवर होती. यातील तीन जागांवर सपा विजय मिळवू शकते. तर तीन जागांवर काँग्रेस जिंकण्याची शक्यता आहे.2014मध्ये काँग्रेसनं केवळ अमेठी आणि रायबरेली या दोन जागा जिंकल्या होत्या. तसेच जिथे काँग्रेस दुसऱ्या स्थानी होती त्या जागाही भाजपानं जिंकल्या होत्या. तर बसपा तिसऱ्या स्थानी होती. भाजपाची शहरी भागात मोठी ताकद आहे. 2014च्या निवडणुकीत भाजपानं मोठ्या बहुमतानं उत्तर प्रदेशातल्या बऱ्याच जागा जिंकल्या होत्या. सपा आणि बसपानं आघाडी करतानाच अमेठी आणि रायबरेलीच्या जागा काँग्रेससाठी सोडल्या आहेत. ऊर्वरित 38-38 लोकसभा जागांचं वाटप केलं होतं. जागांचं वाटप हे दोन्ही पक्षांचं त्या त्या प्रभागात असलेल्या ताकदीनुसार करण्यात आलं आहे, असंही सपाच्या नेत्यानं सांगितलं आहे. तर इतर पक्षांनीही या आघाडीत सहभागी व्हावं, मोर्चेबांधणी आता केली जात आहे. सपा मुरादाबाद, गाझियाबाद, लखनऊ, कानपूर, झांसी, अलाहाबाद, गोरखपूर आणि वाराणसीमध्ये लढण्याची शक्यता आहे.बसपाच्या समर्थनानं गेल्या वेळी समाजवादी पार्टीनं पोटनिवडणुकीत गोरखपूर आणि फुलपूर या मतदारसंघांत भाजपाला पराभवाची धूळ चारत विजय मिळवला होता. 2014मध्येही सपा मुरादाबाद, गाझियाबाद, लखनऊ, कानपूर, झांसी, अलाहाबाद, गोरखपूर आणि वाराणसीच्या जागांवर दोन नंबरवर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसी हा मतदारसंघ असल्यानं यंदा भाजपलाही सपा-बसपाच्या आघाडीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९mayawatiमायावतीAkhilesh Yadavअखिलेश यादव