शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

निवडणुकीत दक्षिण कर्नाटक काँग्रेसबरोबर की भाजपबरोबर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 05:39 IST

कर्नाटकच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा दक्षिण कर्नाटकचा प्रांत यंदा कोणाच्या पारड्यात मताचे दान टाकणार याची उत्सुकता आहे.

- पोपट पवार बंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा दक्षिण कर्नाटकचा प्रांत यंदा कोणाच्या पारड्यात मताचे दान टाकणार याची उत्सुकता आहे. दक्षिण कर्नाटकात वोक्कालिगा समाजाबरोबरच लिंगायतांचेही प्राबल्य आहे. या दोन्ही समाजांचा लंबक ज्याच्याकडे झुकेल, त्याच पक्षाला दक्षिण कर्नाटकात विजयाची पताका फडकविता येणार आहे. दक्षिण कर्नाटकातील १४ जागांवर दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी, १८ एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही दक्षिण कर्नाटकातील अनेक लोकसभा मतदारसंघांत प्रचाराची राळ उडवून दिल्याने येथील सर्वच जागांवरती चुरशीच्या लढती होणार आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण कर्नाटकातील १४ जागांपैकी सहा जागांवर भाजपने विजय मिळविला होता, तर काँग्रेसनेही सहा जागा पटकाविल्या होत्या. जनता दलाने स्वतंत्रपणे लढून दोन जागा मिळविल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत जनता दल व काँग्रेसची आघाडी असल्याने मतविभाजन टळणार आहे. परिणामी, काँग्रेसला दक्षिण कर्नाटकात अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.दक्षिण कर्नाटकातील १४ जागांपैकी बंगणुरू उत्तरमधून भाजपने माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांना रिंगणात उतरविले आहे. गौडा यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने राज्याचे पाणीपुरवठामंत्री कृष्णा बायेर गौडा यांनाच उमेदवारी दिल्याने ही लढत चुरशीची होणार आहे. दुसरीकडे चिकबळ्ळारपूरमधून माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसने बच्चेगौडा यांचे आव्हान आहे.बंगलोर दक्षिणमध्ये माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारून भाजपने तेजस्वी सूर्या या तरुण नेत्याला उमेदवारीदिली आहे. या मतदारसंघात वोक्कालिगा आणि ब्राह्मण समाजाची भूमिका निर्णायक ठरणारी आहे.

सलग २८ वर्षे या मतदारसंघावर भाजपने पकड कायम ठेवली. मात्र, भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसनेही जोरदार तयारी चालविली आहे.>कर्नाटकात काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) ची आघाडी असून, दक्षिण कर्नाटकातील १४ जागांपैकी ११ जागांवर काँग्रेसचे, तर तीन जागांवर जनता दलाचे उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, एक अपक्ष वगळता भाजपने सर्वच जागांवर उमेदवार उभे करीत राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-जनता दल आघाडीपुढे आव्हान उभे केले आहे.
>मोदी आणि राहुल गांधी यांनी येथे घेतल्या सभाचित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. शिवाय मंगळूर आणि बंगळुरूमध्येही ते रॅलीत सहभागी झाले. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मंड्या, कोलार आणि चित्रदुर्ग मतदारसंघांत सभांचा धडाका लावला होता. राहुल गांधी यांनी मंड्यामध्ये माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू व जेडीएसचे उमेदवार निखिल यांच्यासाठी सभा घेतली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKarnataka Lok Sabha Election 2019कर्नाटक लोकसभा निवडणूक 2019