शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडणार?; कुटुंबाबाहेरील व्यक्तीची निवड होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:51 IST

सोमवारी कार्यसमितीची बैठक, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी व्यक्त केलेल्या इच्छेला अनुसरुनच हा निर्णय सोनिया गांधी घेत आहेत.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक सोमवारी होत असून यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी अध्यक्ष पदावरून दूर होण्याबाबतचा प्रस्ताव ठेवू शकतात. उच्चस्तरीय सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी आपल्या मनाची तयारी केली असून, निवडक नेत्यांना याबाबत माहिती दिली आहे की, गांधी कुटुंबाशिवाय अन्य व्यक्ती अध्यक्षपदावर येण्यासाठी त्या या पदावरुन दूर होऊ शकतात.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि आनंद शर्मा यांच्यासह अन्य नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाचे पुनर्गठन करण्याची मागणी केली होती; पण सीडब्ल्यूसीने ते फेटाळून लावत सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षपदी निवड केली होती. मात्र, हा प्रयोगही अयशस्वी राहिला आणि आता सोनिया गांधी हे पद सोडण्याचा प्रस्ताव देऊ शकतात. अर्थात, हंगामी अध्यक्षपदाचे आणखी एक वर्ष त्यांच्याकडे आहे. मात्र, नाराज असलेल्या सोनिया गांधी हे पद सोडण्याबाबत प्रस्ताव मांडू शकतात.

याबाबत संपर्क साधला असता कोणत्याही ज्येष्ठ नेत्याने यावर टिप्पणी केली नाही. सीडब्ल्यूसीचे ज्येष्ठ सदस्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, या व्हर्च्युअल मीटिंगमध्ये आपण सहभागी होणार आहोत.राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार...

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी व्यक्त केलेल्या इच्छेला अनुसरुनच हा निर्णय सोनिया गांधी घेत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी पद सोडले होते. त्यांनी अशीही इच्छा व्यक्त केली होती की, या पदासाठी गांधी कुटुंबाशिवाय अन्य नेत्याची निवड केली जावी.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी