शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपशी सेनेचे मतभेद, कायमचे शत्रुत्व नाहीच, नीलम गोऱ्हे यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 10:01 IST

Neelam Gorhe News: राजकारणात कायमचे कोणी कोणाचे शत्रू नसते, आज भाजपशी केवळ मतभेद असले, तरी तो पक्ष शिवसेनेचा कायमचा शत्रू  आहे, असे नाही. या पक्षांच्या युतीबाबत मी बोलत नाही, मात्र भविष्यात काय होऊ शकते सांगता येत नाही

जळगाव : राजकारणात कायमचे कोणी कोणाचे शत्रू नसते, आज भाजपशी केवळ मतभेद असले, तरी तो पक्ष शिवसेनेचा कायमचा शत्रू  आहे, असे नाही. या पक्षांच्या युतीबाबत मी बोलत नाही, मात्र भविष्यात काय होऊ शकते सांगता येत नाही, असे वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी जळगावात केले. यासोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीतून ते एकत्रदेखील येऊ शकतात, मात्र कार्यकर्त्यांचे काही खरे वाटत नाही, असेही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. कोरोनामुक्त गावे, गरजूंना मदत देण्यासाठी शासनाच्या  योजना तसेच शिवसंपर्क मोहिमेचा आढावा घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे शुक्रवारी जळगावात आल्या होत्या. या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संवाद साधताना त्यांनी आजच्या राजकीय घडामोडींसह विविध पक्षांच्या भूमिकेबद्दल मत व्यक्त केले. भाजप व शिवसेना यांची पुन्हा युती होऊ शकते का, या विषयावर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, याविषयी पक्षप्रमुख, प्रवक्ते बोलतील. मात्र ज्यावेळी या दोन्ही पक्षांची युती होती, त्यावेळी मीदेखील समन्वय समितीमध्ये होते. ही युती का तुटली, ज्या मुद्द्यावर मतभेद झाले याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. युतीच्यावेळी जे ठरले त्यात विश्वासघात झाल्याने आम्ही इतर पक्षांकडे वळलो, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

शिष्टाचाराचा भाग म्हणून भेट असावीभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीविषयी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, ही एक उत्सुकतेची कहाणी आहे. हे दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, ते भेटू शकतात.  राजकारण असल्याने यात काहीही होऊ शकते. कदाचित शिष्टाचाराचा भाग म्हणूनही ते एकमेकांना भेटले असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीतून ते एकत्रदेखील येऊ शकतात, मात्र कार्यकर्त्यांचे एकत्र येणे अशक्य वाटते. 

‘लोकमत’चा आवर्जून उल्लेख : महिला विकासासाठी करीत असलेल्या कामात वेळोवेळी यश आले आहे. याची दखल ‘लोकमत’ने घेतली व ती राज्यभरात पोहोचविली, यामुळे जनजागृती होण्यास अधिक मदत झाल्याचाही उल्लेख डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत केला.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा