शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: नारायण राणेंच्या निषेधार्थ शिवसेनेचा जुहूमध्ये राडा; महिलांकडून पोलिसांना धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 07:41 IST

Narayan Rane: सांताक्रुझ पश्चिमेच्या जुहू तारा रोड येथील राणेंच्या बंगल्याजवळ मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून युवासेनेसह शिवसैनिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती.  ‘नारायण राणे, कोंबडी चोर’ अशा घोषणा देत हातात कोंबड्या घेऊन राणेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मंगळवारी राणेंच्या जुहूतील निवासस्थानाजवळ शिवसैनिकांनी राडा केला. यावेळी महिला शिवसैनिकांकडून पोलिसांना धक्काबुक्की करत राणेंच्या निवासस्थानी जाण्यासाठी बॅरिकेटस देखील हटविण्याच्या प्रयत्न झाला. यावेळी दोन पोलीस जखमी झाले. सहपोलीस आयुक्त (कायदा सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सांताक्रुझ पश्चिमेच्या जुहू तारा रोड येथील राणेंच्या बंगल्याजवळ मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून युवासेनेसह शिवसैनिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती.  ‘नारायण राणे, कोंबडी चोर’ अशा घोषणा देत हातात कोंबड्या घेऊन राणेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जवळपास पाचशे ते सहाशे कार्यकर्ते त्याठिकाणी जमा झाले होते. त्यामुळे जुहूत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर भाजपचे जवळपास शंभर समर्थक हे राणेंच्या निवासस्थानी हजर होते. शिवसैनिकांना रोखण्यासाठी पोलीस सतत त्यांची समजूत काढताना दिसत होते. मात्र त्यांचे काहीही न ऐकता बॅरिकेटस बाजूला करत राणेंच्या निवासस्थानी पोहोचण्याचा प्रयत्न शिवसैनिक करत होते. त्यांना पोलिसांनी अडविल्यावर महिला कार्यकर्त्या हातात झेंडे घेऊन पुढे आल्या. त्यांनी पोलिसांना धक्काबुक्कीही करण्यास सुरुवात केली. या दरम्यान जवळपास दहा कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दोन पोलिसांनाही दुखापत झाल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले.

अखेर दुपारी दीड ते दोनच्या सुमारास विनंती केल्यावर शिवसैनिक माघारी फिरू लागले आणि तणाव निवळला. शिवसेना विभाग क्रमांक १ तर्फेही परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्याकडे राणेंच्या विरोधात निवेदन देण्यात आले. तर, दिंडोशी येथेही शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत मालाड पूर्व परिसरातील रस्ता बंद केला.

गोरेगावात ‘जोडे मारो’ गोरेगाव येथे शिवसेनेने नारायण राणे यांच्या विरोधात मोतीलाल नगर, शिवसेना शाखेसमोर आंदोलन केले. राणेंच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी जोडे मारत दहन केले. यावेळी ३० ते ३५ कोंबड्या सोडून ‘कोंबडी चोर’ अशा घोषणा दिल्या.

दिंडोशीत शिवसेनेचे आंदोलनशिवसेना विभाग क्रमांक ३च्या वतीने आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली दिंडोशी, मालाड पूर्व कुरार येथे नारायण राणे यांच्या विरोधात मंगळवारी निदर्शने करण्यात आली. घोषणाबाजी करत कुरार येथील रस्ता बंद केला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेना