शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस साहेब, ...तर आप्पा दातार चौकात तुमचा सत्कार ठेवू; शिवसैनिकाचं ट्विट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 06:57 IST

नुसती टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री म्हणून एक आदर्श घालून द्या, दाखवून द्या नागपूर पॅटर्न; शिवसैनिकांचं आव्हान

डोंबिवली : कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत आहेत. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील शिवसैनिक तथा माजी परिवहन सभापती राजेश कदम यांनी फडणवीस यांना ट्विट करून नागपूरमध्ये वाढत असलेल्या रुग्णसंख्येकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. नुसती टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री म्हणून एक आदर्श घालून द्या, दाखवून द्या नागपूर पॅटर्न, जबाबदारीने काहीतरी केलेत तर तुमचा डोंबिवलीच्या आप्पा दातार चौकात म्हणजेच फडके पथावर भव्य सत्कार ठेवू, अशा शब्दांत कदम यांनी त्यांना काेपरखळी मारली आहे. नागपूरमध्ये सध्या ४० हजार ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. दररोज येथे तीन ते चार हजार रुग्णांची भर पडते आहे. तेथे भाजपची सत्ता आहे. तुमचे प्रवीण दरेकर, आशिष शेलार, नारायण राणे, किरीट सोमय्या, छोटा राणे, गोपीचंद पडळकर, अतुल भातखळकर, केशव उपाध्ये या सर्व काेराेना तज्ज्ञांना नागपूरमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली घेऊन जा. लागल्यास इतर छोट्या-मोठ्या पक्षातीलपण अनेक तज्ज्ञ आहेत. त्यांच्या मदतीने नागपूरमध्ये कोरोनावर एक महिन्यात नियंत्रण मिळवून दाखवा, कारण या सर्व तज्ज्ञ मंडळींकडे अनेक उपाय आहेत. महाराष्ट्राला तुमच्या सहकार्याची गरज असताना तुम्ही फक्त राजकारण करत आहात. सत्ता काय येते जाते. तुम्ही फडणवीस पॅटर्न राबवारेल्वे, देऊळ, बस, दुकाने, फेरीवाले व इतर सर्व आस्थापना बंद न करता, लॉकडाऊन न करता काेराेना घालवण्याच्या तुमच्याकडे १०१ आयडिया आहेत. विशेषत: मोदी सरकारची मदत घेऊन दाखवून द्या संपूर्ण जगाला हा फडणवीस कसा चमत्कार घडवताे ते. सरकार, बृहन्मुंबई महापालिका अभिमानाने धारावी पॅटर्न सांगते तसेच तुम्हीही नागपूरवर नियंत्रण मिळवले तर फडणवीस पॅटर्न म्हणून तुमचे कौतुक करू.तुमच्याच काय तुमच्या अनेकांच्या स्वप्नातही नव्हते की पाच वर्षांत तुमची सत्ता जाईल म्हणून. आज मराठी माणूस कोरोनाच्या भयंकर विळख्यात आहे. कोरोना बघत नाही की हा भाजपचा आहे की शिवसेनेचा अशा शब्दांत कदम यांनी ट्विटद्वारे फडणवीस यांना सुनावले आहे. कदम यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून त्याची चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना