शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Shivsena-BJP: शिवसेनेला मोठा फटका; महिला नेत्या आशा बुचकेंनी समर्थकांसह केला भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 17:24 IST

आशाताई बुचके यांना शिवसेनेत न्याय मिळाला नाही. पण भाजपामध्ये त्यांचा सन्मान राखला जाईल असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

ठळक मुद्देजेव्हा विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळी त्यांना आमदार झालेले पाहू भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर भाजपाला सत्तेवर आणू.

मुंबई – मागील महिन्यात काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या बड्या नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांनी अखेरच भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

जुन्नर विधानसभा निवडणुकीत आशा बुचके यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. याठिकाणचे तत्कालीन मनसेचे आमदार शरद सोनवणे यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर जुन्नर मतदारसंघातून शिवसेनेने सोनवणे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे आशा बुचके शिवसेनेवर नाराज झाल्या. नारायणगावच्या पदाधिकारी मेळाव्यात आशा बुचके यांनी सोनवणे यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव आणि विधानसभेत घेतलेली भूमिका यामुळे आशा बुचके यांनी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला,भाजपाला विस्ताराची संधी

आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात मोकळ्या श्वासाने पक्षाचे काम करू आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर भाजपाला सत्तेवर आणू. आशाताईंसारख्या कार्यकर्त्या सत्तारूढ पक्षातून भाजपामध्ये येतात ही स्वबळावरील विजयाची नांदी आहे. आशाताई बुचके यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांचा भाजपामध्ये सन्मान केला जाईल. भाजपामध्ये आतला - बाहेरचा, जुना – नवा असा भेद नाही. एकदा पक्षाचा झेंडा हाती घेतला की पक्ष त्या नेत्याची काळजी करतो. राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपाला पक्षविस्ताराची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. युतीमध्ये असताना भाजपाला पक्षविस्ताराला संधी मिळत नव्हती. आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यातील घटक पक्षांचा श्वास कोंडू लागला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आशाताईंचा सन्मान ठेवला जाईल

आशाताई बुचके यांना शिवसेनेत न्याय मिळाला नाही. पण भाजपामध्ये त्यांचा सन्मान राखला जाईल आणि त्यांना न्याय मिळेल. जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळी त्यांना आमदार झालेले पाहू असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. तर भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटते. पक्षाची कार्यकर्ता म्हणून आपण प्रत्येक घरात कमळ पोहचविण्यासाठी काम करू असं आश्वासन आशा बुचके यांनी दिलं.

कोण आहेत आशा बुचके?

आशा बुचके या २००२ पासून जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. शिवसेनेच्या जिल्हा परिषद  गटनेत्या म्हणुन त्या कार्यरत होत्या. त्यांनी २००९ आणि २०१४ मध्ये पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती. २००९ मध्ये शरद सोनवणे यांना दिलेले  विधानसभेचे तिकीट पुन्हा आशाताई यांना देण्यात आले होते. या निवडणुकीत आशा बुचके यांना वल्लभ बेनके यांच्या विरोधात ६००० मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. जिल्हा परिषद निवडणुका त्यांनी तालुक्यात विविध गटातून लढविल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत जुन्नरमध्ये शिवसेना पक्षाला सर्वात मोठा फटका बसला होता. येथे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना ४२ हजाराचे मताधिक्य मिळाले होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील