शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

फडणवीसांसोबत राजकीय चर्चा झाली का?; डॉक्टरांचं उदाहरण देत राऊत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 14:43 IST

राज्यातलं सरकार पाच वर्षे टिकणार; शिवसेना नेते संजय राऊत यांना विश्वास

मुंबई: राज्यात मध्यावधी निवडणूक होण्यासारखी परिस्थिती असल्याचं विधान करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल, यावर सगळ्यांचं, अगदी भाजपचंही एकमत आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट मुलाखतीसाठी घेतली होती, याचा पुनरुच्चार करत आम्ही यापुढेही भेटणार आहोत. विरोधकांशी संवाद असायला हवा, असं राऊत यांनी सांगितलं.संजय राऊत यांची भेट घेतल्यानं शिवसेनेतला एक गट नाराज असल्याची चर्चा आहे. यावरही संजय राऊत यांनी भाष्य  केलं. 'आमच्या भेटीवर कोणी नाराज असेल असं वाटत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मी गेल्या वर्षी भेटत होतो. त्यामुळेही काही जण नाराज होते. मात्र त्यातूनच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं,' असं राऊत म्हणाले. विरोधी पक्षांमधील नेत्यांना भेटायचं नाही असा कायदा आहे का, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.दोन राजकीय नेते भेटतात, तेव्हा राजकीय चर्चा होतच असते. दोन डॉक्टर भेटतात तेव्हा वैद्यकीय क्षेत्रातल्या घडामोडींवर चर्चा होते. साहित्यिक भेटतात, तेव्हा साहित्यावर गप्पा होतात. शास्त्रज्ञ भेटले की संशोधनांबद्दल बातचीत होते. तसंच राजकीय नेत्यांचंही आहे, अशा शब्दांत राऊत यांनी फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीवर भाष्य केलं. राज्यातलं सरकार पाच वर्ष टिकणार आहे. त्यामुळे पुढील वर्षे विरोधकांना काही काम नाही, असा टोला त्यांनी लगावला.सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे माजी डीआयजी गुप्तेशर पांडे यांचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. 'गुप्तेशर पांडे जेडीयूमध्ये गेले. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. कोणी कोणत्या पक्षात जावं, तो त्यांचा प्रश्न. त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे आणि त्यांचा तो अधिकार आहे. पण त्यांनी सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची नाहक बदनामी केली, यावर मला आक्षेप आहे,' असं राऊत म्हणाले. मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांचे दात लवकरच घशात जातील, अशा शब्दांत त्यांनी भाजपलाही लक्ष्य केलं. आता आम्ही सीबीआयच्या अहवालाची वाट पाहत आहोत. सीबीआयनं गेल्या महिन्याभरात काय केलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवार