शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब यांच्या अटकेवरून अमित शहा कडाडले; शिवसेना खासदाराने मोजक्या शब्दांत सुनावले

By कुणाल गवाणकर | Updated: November 4, 2020 15:52 IST

Arnab Goswami Arrested: महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या अमित शहांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवरून महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षात जुंपली आहे. गोस्वामी यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीनं होत असल्याचा आरोप भाजपच्या अनेक नेत्यांनी केला. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करत ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गोस्वामींची अटक कायदेशीर पद्धतीनंच झाल्याचा दावा केला."गोस्वामी भाजप कार्यकर्ते आहेत का? मग त्यांच्यासाठी भाजपकडून इतकी आरडाओरड कशासाठी?"केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीदेखील राज्य सरकारच्या कारवाईवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे सरकारची कारवाई आणीबाणीची आठवण करून देणारी असल्याचं शहांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. शहांच्या टीकेला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अर्णब गोस्वामींच्या अटकेचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी संबंध काय?, असा थेट सवाल सावंत यांनी विचारला आहे. एका व्यवसायिकेचे पैसे बुडवल्यानं आणि त्या व्यवसायिकानं आत्महत्या केल्यानं गोस्वामींना अटक झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आधी माहिती घ्यावी आणि मग बोलावं, अशा शब्दांत सावंत यांनी सुनावलं आहे.अन्वय नाईक कोण होते?, त्यांची आत्महत्या आणि अर्णब गोस्वामींचं कनेक्शन काय?... वाचाशहांचं महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र'काँग्रेसचे आणि त्यांच्या मित्र पक्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली. रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात सत्तेचा गैरवापर करून झालेली कारवाई व्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाहीवरीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला आहे. यामुळे मला आणीबाणीची आठवण येते. माध्यमांच्या स्वातंत्र्यावरील या हल्ल्याचा निषेध व्हायला हवा आणि तो होईलच,' अशा शब्दांत शहांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.अनिल परब यांच्याकडूनही भाजपचा समाचाररिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. त्यांनी अन्वय नाईक नावाच्या एका व्यवसायिकाचे पैसे बुडवले. त्यामुळे नाईक यांनी आर्थिक विंवचनेतून आत्महत्या केली. म्हणून गोस्वामींना अटक झाली आहे, असं शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. भाजप नेते त्यांच्या कार्यकर्त्याविरोधात कारवाई झाल्यासारखे ओरडताहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीRepublic TVरिपब्लिक टीव्हीAmit Shahअमित शहाArvind Sawantअरविंद सावंत