शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला वगळून यूपीए अशक्य; NDA तून बाहेर पडलेली शिवसेना UPA मध्ये जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 07:08 IST

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, काँग्रेसला वगळून भाजपच्या विरोधात कोणतीही आघाडी सक्षम राहू शकणार नाही.

नवी दिल्ली : काँग्रेसला बाजूला करून भाजपच्या विरोधात विरोधकांना लढता येणार नाही. यासाठी यूपीए मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी भूमिका शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत मुंबईत चर्चा झाली आहे. पुन्हा त्यांच्याशी चर्चा करू. काँग्रेसला वगळून भाजपच्या विरोधात कोणतीही आघाडी सक्षम राहू शकणार नाही. यूपीएमध्ये आणखी पक्षांना सोबत आणण्यावर चर्चा करून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याशी चर्चा करण्यात येईल. यूपीएचे नेतृत्व सोनिया गांधी करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर यूपीएच्या कोणाचाही आक्षेप नाही.  यूपीए मजबूत होण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करून खासदार राऊत म्हणाले, नेतृत्वाचा प्रश्न नंतर येतो. त्यावर नंतर विचार करता येईल. पहिल्यांदा यूपीएमध्ये अधिक पक्ष सामावून घेण्याची आवश्यकता आहे. याबद्दल चर्चा सुरू राहणार आहे. तिसरी किंवा चौथी आघाडी ही भाजपला मदत करणारी ठरेल.

शिवसेना यूपीएत? शिवसेना पक्ष अनेक वर्षे भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये होता. परंतु दोन वर्षांपूर्वी सेना एनडीएतून बाहेर पडली. अद्यापही शिवसेनेने यूपीएत अधिकृत प्रवेश घेतलेला नाही. परंतु संजय राऊत यांची अलीकडील वक्तव्ये ही शिवसेना यूपीएच्या जवळ जात असल्याचे इशारे देणारी आहेत.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस