शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशात-राज्यात पवारांची भाजपविरोधी मोर्चेबांधणी; प्रशांत किशोर यांच्यासोबत राष्ट्रवादीची गुप्त खलबते

By अतुल कुलकर्णी | Updated: June 12, 2021 07:03 IST

Sharad Pawar : प्रशांत किशोर यांच्यासोबत रणनीती आखण्याबद्दल शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सहमती असल्याचे समजते. देशपातळीवर कशा पद्धतीने नियोजन केले जावे, यावरही या बैठकीत चर्चा झाली.

- अतुल कुलकर्णी

मुंबई : देशात आणि राज्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपविरोधी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी प्रख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत तब्बल तीन तास गुप्त खलबते केली. महाराष्ट्र आणि केंद्रात भाजपला दूर ठेवायचे, त्याच वेळी देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सक्षम पर्याय कसा द्यायचा, यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. 

प्रशांत किशोर यांच्यासोबत रणनीती आखण्याबद्दल शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सहमती असल्याचे समजते. देशपातळीवर कशा पद्धतीने नियोजन केले जावे, यावरही या बैठकीत चर्चा झाली. प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या समवेत भोजनही केले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या वेळी कशा पद्धतीने रणनीती आखली जावी, मतदारसंघनिहाय नियोजन कशा पद्धतीने केले जावे, यावरही किशोर यांनी भाष्य केल्याचे समजते.

बैठकीत खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार हेही उपस्थित होते. देशपातळीवर विचार करताना विरोधकांकडे आश्वासक चेहऱ्याची गरज आहे. त्यासाठी  सामूहिक नेतृत्व पुढे आणावे लागेल. राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी, असे चित्र पुढे येऊ नये यावरही बैठकीत विचारविनिमय झाला. 

भाजप समाजातल्या प्रत्येक घटकांवर आणि प्रसंगावर भाष्य करते. कोणाला पटो न पटो भूमिका घेते. समाजाच्या दोन वाटण्या करायच्या आणि एक वाटा काँग्रेसला देऊन त्यावरून काँग्रेसची बदनामी करायची, ही रणनीती भाजपने आखली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नुकसान होत असताना, त्यांच्याकडून फारशी हालचाल होत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी थेट संपर्कावर भर द्यावा लागेल. लोकांमध्ये थेट जावे लागेल. तरच भाजपने तयार केलेले पर्सेप्शन बदलू शकते, असे मत प्रशांत किशोर यांनी बैठकीत मांडले. भारताचा विचार करता कमी शिक्षित भागात आणि एससी आणि एसटीसाठी राखीव मतदारसंघांमध्ये भाजपला जास्त मतदान झाल्याची आकडेवारी किशोर यांनी सांगितली. 

भाजप वगळता अन्य पक्षांकडून वातावरण निर्मिती करण्याचे काम केले जात नाही. लोकसभेला आणि विधानसभेच्या वेळी काँग्रेस जिंकण्यासाठी लढताना दिसली नाही. परिणामी काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांमध्ये निरुत्साह होता. काँग्रेसला जास्त जागा सोडल्या तर भाजपला कसा फायदा होतो, याची आकडेवारीही प्रशांत किशोर यांनी बैठकीत सांगितल्याचे समजते. 

स्थानिक आघाड्यांमुळे कॉंग्रेसचे मतविभाजन, फायदा झाला भाजपला- २००९ मध्ये लोकसभेला भाजपला १८.८ टक्के मते आणि ११६ जागा मिळाल्या. दहा वर्षांनी काँग्रेसला २०१९ मध्ये १९.६९ टक्के मते आणि ५२ जागा मिळाल्या. - दहा वर्षांनंतर काँग्रेसला एक टक्का जास्त मते मिळूनही त्यांच्या ६४ जागा कमी झाल्या. - त्याचे कारण त्या, त्या राज्यांमध्ये स्थानिक पक्षांसोबत आघाडी केल्यामुळे काँग्रेसचे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झाले. त्याचा फायदा भाजपला झाला, हे किशोर यांनी शरद पवार यांना पटवून दिले.

यंत्रणा उभाराजुन्या व नव्याने येणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी,  पक्षीय मुद्दे पोहोचवण्यासाठी भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाकडे शास्त्रीय पद्धतीने काम करणारी यंत्रणा नाही. ती यंत्रणा उभी करावी लागेल, अशी सूचना त्यांनी केली.

ठामपणे भाजपविरोधी भूमिका न घेणाऱ्यांशी बोलणार ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी आणि तेलंगणाचे चंद्रशेखर राव हे तिघे आजही मोदीविरोधी ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत. यासाठी जगनमोहन रेड्डी यांच्याशी प्रशांत किशोर बोलतील. बाकी दोघांशी स्वतः शरद पवार यांनी बोलावे, अशीही चर्चा झाली. 

...उर्वरित ३० टक्के मतदान चित्र बदलते ज्या ठिकाणी मजबूत प्रादेशिक पक्ष आहेत त्या ठिकाणी काँग्रेसला जास्त जागा सोडल्यास काँग्रेसचे नुकसान व भाजपचा फायदा होतो. स्थानिक प्रादेशिक पक्षांना त्यामुळे नुकसान होते, असे सांगून प्रशांत किशोर यांनी त्यासाठीचे नियोजन करावे लागेल असे सांगितले. धर्म, पंथ, गट, संघटना यांचे कितीही ध्रुवीकरण झाले तरी त्या गटातून ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मते मिळू शकत नाहीत. उर्वरित ३० टक्के मतदान निवडणुकीचे चित्र बदलू शकते. मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPrashant Kishoreप्रशांत किशोर