शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळें'साठी शरद पवारांचीही हर्षवर्धन पाटील यांना साद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 21:33 IST

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी अजित पवार यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हर्षवर्धन पाटील यांना साद घातली आहे. मात्र त्याबदल्यात पाटील यांनी इंदापूर, भोर आणि पुरंदरची विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठीची इच्छा बोलावून दाखवली आहे. 

पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी अजित पवार यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हर्षवर्धन पाटील यांना साद घातली आहे. मात्र त्याबदल्यात पाटील यांनी इंदापूर, भोर आणि पुरंदरची विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठीची इच्छा बोलावून दाखवली आहे. 

     चार दिवसांपूर्वी अजित पवार यांनीही पुण्यात पाटील यांच्या निवासस्थानी 'डिनर डिप्लोमसी' करत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज पवार आणि पाटील यांच्यातील बैठकीनंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. २०१४साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडी झाली नसल्याने राष्ट्रवादीने पुरंदरमध्ये संजय जगताप आणि इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा केलेला पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटेदेखील खूप प्रयत्नांनी निवडून आले होते. हे तीनही मतदारसंघ बारामतीमध्ये येत असल्याने तिथून राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या मताधिक्यासाठी पाटील यांची गरज आहे. दुसरीकडे भाजपने कांचन कुल यांच्या रूपाने सुळे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. त्यात कुल कमळावर लढणार असल्याने त्यांना खड़कवासल्यातून फायदा होण्याची चिन्हे आहेत. त्यांचे बारामती तालुक्यात नातेसंबंध असल्यामुळे तिथेही सुळे यांना मतांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. अशावेळी पुरंदर, भोर आणि इंदापूरची मते सुळे यांच्याकरीता महत्वाची ठरणार आहे. म्हणून मागील निवडणुकीत दुखावलेल्या पाटील यांची समजूत काढण्यासाठी स्वतः शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. सोमवारी काँग्रेस भवनमध्ये झालेल्या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हर्षवर्धन पाटील यांच्यासह अजित पवार यांनीही ऍक्टिव्ह होत सहभाग घेतल्याने 'पाटील-पवार' दिलजमाई झाल्याची चर्चा आघाडीत रंगत आहे. 

टॅग्स :baramati-pcबारामतीSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळे