शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार : कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारा नेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 18:58 IST

Sharad Pawar Birthday : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग एकदा मला म्हणाले, कृषी क्षेत्रातील कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास मी आधी शरद पवार यांच्याशी चर्चा करतो. त्यानंतरच तो जाहीर करतो. अलीकडचे चित्र बदलले. पवारानंतर कोणी कृषिमंत्रीपदाची प्रतिष्ठा टिकवू शकले नाहीत.

- राजदीप सरदेसाई (ज्येष्ठ पत्रकार) माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग एकदा मला म्हणाले, कृषी क्षेत्रातील कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास मी आधी शरद पवार यांच्याशी चर्चा करतो. त्यानंतरच तो जाहीर करतो. अलीकडचे चित्र बदलले. पवारानंतर कोणी कृषिमंत्रीपदाची प्रतिष्ठा टिकवू शकले नाहीत. शेती हा पवारांचा मूलत: आवडीचा विषय. त्यामुळेच ते या क्षेत्रात आमूलाग्र बदल करू शकले. शेतीला पूरक असलेल्या डेअरी किंवा अन्य विभागात पवारांचे खूप मोठे योगदान आहे. देशहितासाठी २४ बाय ७ राजकारण करणारा हा नेता आहे.मी पवार यांच्यासह पहिल्यांदा महाराष्ट्रात हेलिकॉप्टर दौऱ्यावर गेलो १९९० मध्ये! ते हेलिकॉप्टरमधून मला या गावातील कोण सरपंच आहे, जिल्हा परिषदेचा कोण अध्यक्ष आहे, हे सांगत होते. इतकी महाराष्ट्रात त्यांची पकड होती व आहे. मला ते म्हणाले, मी हेलिकॉप्टरचा, अ‍ॅम्बेसेडर गाडीचा नेता आहे. ३० वर्षांनंतर २०१९ मध्ये मी पुन्हा त्यांच्यासह दौऱ्यावर गेलो. फरक एवढाच आहे, आता माझे केस पांढरे झालेत. साताऱ्याला सभा होती. आम्ही सभा बघत होतो. पाऊस खूप पडत होता. कॅमेरामन म्हणाला, या पावसात शूटिंग कसे करायचे? आयोजकांनी सभा रद्द करू, असे सांगितले, परंतु पवार म्हणाले, नाही. लोक आले आहेत. खूप पाऊस असल्याने चिंब भिजतच ते सभेत बोलत होते. विधानसभा निवडणुकीतले महाराष्ट्राच्या इतिहासातील असे दृश्य अपवादात्मक असावे.     रात्री १२ वाजता असो की, सकाळी ६ वाजता पवारांचा फोन येतो आणि एखाद्या विषयावर सखोल चर्चा करतात. एखादी बातमी चुकली, तर ते निदर्शनास आणून देतात आणि मैत्रीही जपतात. पवारसाहेबांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो ही मन:पूर्वक प्रार्थना.टीका केली तरी मनात ठेवत नाहीत अलीकडे पत्रकारांशी मनमोकळे बोलणारे नेते नाहीत. आम्ही कितीदा तरी त्यांच्यावर टीका केली, परंतु ते मनात ठेवत नाहीत. लगेच दुसऱ्या दिवशी बोलायला तयार असतात. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसच मुख्यंमत्री होतील, राष्ट्रवादी संपल्यात जमा आहे, असे माध्यमांमध्ये येत होत, परंतु त्यांनी ही बाब मनाला लावून घेतली नाही. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण