शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

शरद पवार : असाध्य ते साध्य करणारे कर्मवीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 19:13 IST

Sharad Pawar News : शरदराव हे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व झालेले आहे. महाराष्ट्रातील मुत्सद्दी नेते आहेत. २०१९ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणात क्रांतिकारक बदल घडवून आणले. असाध्य ते साध्य करून दाखविले.

- प्रतिभाताई पाटील(माजी राष्ट्रपती.) शरदराव हे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व झालेले आहे. महाराष्ट्रातील मुत्सद्दी नेते आहेत. २०१९ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणात क्रांतिकारक बदल घडवून आणले. असाध्य ते साध्य करून दाखविले. महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण देऊन देशाचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रात अनपेक्षितरित्या महाआघाडीचे सरकार आणले.शरदराव यांनी विविध पदांवर राहून केलेली कामगिरी त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये बनत गेली. आता त्यांची गणना देशाच्या शीर्ष नेतृत्वामध्ये होते. त्यांची विचारांची झेप व दूरदृष्टीची चमक आता स्पष्टपणे राष्ट्रव्यापी विचाराने प्रेरित झालेली दिसते.१९६७ पासून आजपर्यंत ते ज्या वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीमधून गेलेत व त्यातून जे वेगवेगळे अनुभव आलेत, त्यातून त्यांचे समृध्द व्यक्तिमत्व घडले. कठीण परिस्थितीतून योग्य मार्ग काढून त्या मार्गावर चालताना पडेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारी असते. संकटाच्या काळात ते नेहमी खंबीरपणे निर्णय घेतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना श्री शाहू महाराज, ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजकारण ते कधी विसरले नाहीत. त्यांच्या पुरोगामी विचारांचा ठसा त्यांच्या राजकीय जीवनात दिसतो. महाराष्ट्राची नस न‌् नस पवार बरोबर ओळखतात.  त्यांच्या बरोबरीची कुशलता असणारे फार थोडे राजकारणी देशात आहेत. १९७९ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना एकमेकांवर टीका न करता आम्ही संयुक्तपणे महाराष्ट्राचा दौरा केला व लोकांना तातडीने मदत कशी पोहचवता येईल असा प्रयत्न केला. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. आदर कायमशरदराव १९७९ मध्ये मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्ष नेता होते. त्यावेळी त्यांच्यावर भरपूर टीका व हल्ला चढवला. पण त्यांनी कधी कटुता आणू दिली नाही. त्यांच्याबद्दलचा आमचा आदरही कमी झाला नाही.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटील