शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी मतदारसंघात सात पदवीधर उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 00:53 IST

लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी मतदारसंघातून अखेर १५ उमेदवार रिंगणात आहेत.

पंढरीनाथ कुंभार भिवंडी : लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी मतदारसंघातून अखेर १५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का २० आहे.१५ पैकी तीन उमेदवार उच्चशिक्षित आहेत. त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरुण सावंत हे माजी कुलगुरू आहेत. त्याचबरोबर तीन उमेदवार पदव्युत्तर, तर तीन जण पदवीधर आहेत.बारावी आणि त्यापेक्षा कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांचा टक्का ५३ इतका आहे. तीन उमेदवार बारावी, तर चारजण बारावीपेक्षा कमी शिकलेले आहेत. मतदारसंघातील १५ उमेदवारांपैकी सात अपक्ष, तर उरलेले आठ उमेदवार राजकीय पक्षांचे आहेत. या उमेदवारांच्या शिक्षणाचा एकंदरीत आढावा घेता उमेदवारांपैकी तीन उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.दहावीपुढील शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या ११ आहे. तर, दहावीपेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची टक्केवारी ५३ इतकी असून त्यांची संख्या चार आहे. यातील एक उमेदवार अशिक्षित आहे.>वाणिज्य शाखेचे सर्वाधिक पदवीधरसर्व पदवीधर उमेदवारांमध्ये कला विषयातील सर्वाधिक तीन उमेदवार पदवीधर आहेत. तर, दोन वाणिज्य व दोन वैद्यकीय शाखेतील पदवीधर आहेत. त्यापैकी एक मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तर, राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. तर, एक वकील आहे.>अल्पशिक्षितांचीभाऊगर्दीभिवंडी मतदारसंघात भिवंडी, कल्याण, बदलापूर ही प्रमुख तीन शहरे येतात. त्यातील मतदार सुशिक्षित आहेत. सध्या रिंगणात असलेले सहा उमेदवार उच्चशिक्षित आहेत. मात्र, उर्वरित नऊ उमेदवार अल्पशिक्षित आहेत. यात दहावी नापास दोन उमेदवार आहेत. आठवी व पाचवी उत्तीर्ण असलेल्या दोन उमेदवारांचा समावेश आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांची संख्या सहा असून उच्चशिक्षितांचा पुढाकार या मतदारसंघात फारसा दिसून येत नाही.>मतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर?सर्वाधिक पदव्याअसलेले तीन उमेदवारसर्वाधिक पदव्या असलेले तीनही उमेदवार राजकीय पक्षांचे असून एका उमेदवाराकडे चार तर दोघांकडे प्रत्येकी दोन पदव्या आहेत. त्यापैकी एकाकडे वाणिज्य पदवीसह वकिली क्षेत्रातील आणि संगणकाची पदवी आहे. तर, दोघांकडे विज्ञानाची पदवी आहे.दहावी, बारावीउत्तीर्णांची संख्या चारदहावी उत्तीर्ण एक, तर बारावी उत्तीर्ण झालेले तीन उमेदवार आहेत. हे चारही उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, दहावी व त्यापेक्षा कमी शिकलेले तीन उमेदवारही अपक्ष आहेत.अशिक्षित उमेदवारही आखाड्यातएका राजकीय पक्षांच्या उमेदवाराने आपल्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक अर्हतेपुढे ‘नाही’ असे नमूद केले आहे. यावरून अशिक्षित उमेदवारही निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट होत आहे. सुशिक्षित मतदार कोणाच्या पदरात मते टाकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhiwandi-pcभिवंडी