शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

“...अखेर त्याने मला गाठलेच”; हॉस्पिटलमधून आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संवेदनशील पत्र

By प्रविण मरगळे | Updated: February 22, 2021 15:06 IST

Health Minister Rajesh Tope Letter: लॉकडाऊन टाळणं,केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे, तेव्हा आपणांस माझे कळकळीचे आवाहन राहील की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन पाळा असं राजेश टोपेंनी सांगितले.

ठळक मुद्देमी पुन्हा एकदा कोरोनाविरुद्धच्या सामुहिक लढाईत सहभागी होणार आहेलॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिलामागील वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता, मी राज्यातील अनेक भागात गेलो

मुंबई – राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला आवाहन करताना सूचक इशारा दिला आहे, कोरोना टाळण्यासाठी मास्क घाला, शिस्त पाळा अन्यथा लॉकडाऊन करू असं सांगत पुढील ८ दिवस महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे.(Health Minister Rajesh Tope wrote letter to Maharashtra People over Corona increase in State Again) 

राजेश टोपे(Rajesh Tope)  यांनी हॉस्पिटलमधून जनतेला पत्र पाठवलं आहे, त्यात म्हटलंय की, गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत, शासनाची खंबीर भूमिका ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे, विशेषत: डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो, मात्र अद्यापही कोरोना गेलेला नाही, तो पुन्हा डोके वर काढत आहे, तेव्हा पुन्हा एकदा सामुहिक लढाई लढावी लागणार आहे, मी सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्ध लढतो आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मागील वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता, मी राज्यातील अनेक भागात गेलो, कोरोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या, परंतु कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच, मात्र आपल्या सदभावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा कोरोनाविरुद्धच्या सामुहिक लढाईत सहभागी होणार आहे, समजदार, संवेदनशील आणि सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे, म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला, मात्र आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही, लॉकडाऊन टाळणं,केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे, तेव्हा आपणांस माझे कळकळीचे आवाहन राहील की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन पाळा असं राजेश टोपेंनी सांगितले. दरम्यान, स्वत:ची काळजी म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी, प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी, तेव्हा चला तर हरवूया कोरोनाला, एकजुटीने, एकमताने आणि एकनिर्धाराने असंही राजेश टोपे म्हणाले.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे