शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेचे शिल्पकार, भारताचे मेट्रोमॅन ई. श्रीधरन राजकारणात उतरणार; या पक्षात प्रवेश करणार

By बाळकृष्ण परब | Updated: February 18, 2021 13:49 IST

India's Metroman E. Sreedharan will enter politics : देशाचे मेट्रोमॅन आणि कोकण रेल्वेचे निर्माते म्हणून ओळख असलेले ई. श्रीधरन हे सुद्धा राजकारणात उतरणार आहेत

ठळक मुद्देदेशाचे मेट्रोमॅन आणि कोकण रेल्वेचे निर्माते म्हणून ओळख असलेले ई. श्रीधरन हे भाजपात प्रवेश करणार आहेत भाजपाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ई. श्रीधरन हे २१ फेब्रुवारी रोजी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेतकोकण रेल्वेसारखा अवघड प्रकल्प ई. श्रीधरन यांच्या कौशल्यामुळे प्रत्यक्षात उतरला होता

नवी दिल्ली - केरळमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी भाजपाने (BJP) कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपाकडून अनेक जणांना पक्षासोबत जोडून घेतले जात आहे. दरम्यान देशाचे मेट्रोमॅन आणि कोकण रेल्वेचे (Kaonkan Railway) निर्माते म्हणून ओळख असलेले ई. श्रीधरन (E. Sreedharan) हे सुद्धा राजकारणात उतरणार असून, ते भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ई. श्रीधरन हे २१ फेब्रुवारी रोजी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. (India's Metroman E. Sreedharan will enter politics; Will joins BJP soon )केरळमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी सांगितले की, भाजपा लवकरच राज्यात विजय यात्रा अभियान सुरू करणार आहे. यादरम्यान, ई. श्रीधरन हे पक्षाचे सदस्यत्व स्वीकारतील. ई. श्रीधरन यांच्या कुशल नेतृत्वामुळे दिल्ली मेट्रोचे स्वप्न साकार झाले होते. कोकण रेल्वेसारखा अवघड प्रकल्पही ई. श्रीधरन यांच्या कौशल्यामुळे प्रत्यक्षात उतरला होता. ई. श्रीधरन यांच्या या कार्याचा गौरव भारत सरकारने पद्मविभूषण, पद्मश्रीसारखे पुरस्कार देऊन केला आहे.दिल्ली मेट्रोप्रमाणेच कोलकाला मेट्रो, कोची मेट्रोसह देशातील अनेक मोठ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये ई. श्रीधरन यांचे योगदान राहिले आहे. त्यामुळेच त्यांचा भारताचे मेट्रोमॅन म्हणून आदराने उल्लेख केला जातो.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाKeralaकेरळElectionनिवडणूक