शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: "…तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येईल’’, संजय राऊत यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 12:59 IST

Sanjay Raut in Jalgaon: शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या उपस्थितीत जळगाव महानगर शिवसेनेची आढावा बैठक झाली.

जळगाव - शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या उपस्थितीत जळगाव महानगर शिवसेनेची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शिवसैनिकांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका. जोरात काम केले तर जळगावात आपला खासदार निवडून येईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ( "If we work hard, Shiv Sena MP will be elected in Jalgaon", Sanjay Raut's big statement)

संय राऊत म्हणाले की, पती विरोधी पक्षनेता आणि पत्नी महापौर असा योगायोग असलेली जळगाव महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगर पालिका असेल. शिवसैनिकांनो सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका, जोरात काम केलं तर जळगावमध्ये आपला खासदार निवडून येईल. गुलाबराव पाटील यांनी जबाबदारी घेतली की ते पार पाडतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी यावेळी गुलाबराब पाटील यांचेही कौतुक केले. 

संजय राऊत यावेळी म्हणाले की, शिवसेना या चार अक्षरांमध्ये चमत्कार आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच आपण पुढे जात आहात. जळगावमध्ये सत्तांतर होत असताना ते नगरसेवक कुठून आले, कसे आले, हे आता महत्त्वाचे नाही. आज जळगावच्या सुवर्णनगरीचा कोळसा झाला आहे. ही परिस्थिती सुधारली पाहिजे. जो उत्तम पद्धतीने महानगरपालिका चालवतो तो राज्यही चालवू शकतो. मुंबई मनपानंतर आता उद्धव ठाकरे हे राज्य चालवत आहेत, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना