शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

साध्वीच्या विरोधात प्रचाराला पुरोगामी कार्यकर्त्यांची फौज जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 07:04 IST

मालेगाव स्फोटातील पीडित, राष्ट्रसेवा दलांचा पुढाकार; भोपाळमध्ये न्या.कोळसे-पाटील, जितेंद्र आव्हाडही जाणार

मुंबई : शहीद अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधानानंतर साध्वी प्रज्ञासिंह हिने दिलगिरी व्यक्त केली असली, तरी तिच्याविरुद्धचा संताप कमी झालेला नाही. साध्वीच्या विरोधात भोपाळ लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करण्याचा निर्णय, पुणे, मालेगाव, मुंबईतील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

निवृत्त न्या. बी. जी. कोळसे-पाटील, राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार, मालेगावातील कुल जमात-ए तंजीमचे अध्यक्ष मौलाना अब्दुल हमीद अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली स्फोटातील मृत्यू पावलेल्यांचे नातेवाईक, जखमी, तसेच कार्यकर्त्यांचे पथक रवाना होईल. बॉम्बस्फोटातील प्रज्ञासिंहचा सहभाग, सहकाऱ्यांसोबत तिने रचलेला कट, करकरे यांच्या नेतृत्वाखालील एटीएसचा तपास, न्यायालयात सादर केलेले आरोपपत्र आणि ‘एनआयए’ने केलेला बदल आदींबाबत सविस्तर माहिती तेथील मतदारांपुढे ठेवली जाणार आहे. 

करकरे यांनी कसल्याही दबावाला न जुमानता मालेगाव स्फोटातील खºया आरोपींचा छडा लावला होता. राष्टÑविरोधी कृत्य करणाºया साध्वींनी त्यांच्यावर केलेली टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. स्फोटातील पीडितांसह भोपाळमध्ये जाऊन तेथील मतदारांना वास्तवाची जाणीव करून दिली जाईल.- मौलाना अब्दुल हमीद अन्सारी, अध्यक्ष, कुल जमात-ए-तंजीम, मालेगावया निमित्ताने केवळ साध्वीच नव्हे, तर भाजपचे खरे रूप जनतेसमोर मांडले जाईल. भारतीय संस्कृती काय आहे, याबद्दल मतदारांना जाणीव करून देण्यासाठी मी माझ्या पथकासह भोपाळला जाणार आहे. पुरोगामी चळवळीतील जितके कार्यकर्ते येतील, त्यांना सोबत घेऊन भाजपचा बुरखा फाडला जाईल.- आ. जितेंद्र आव्हाड, राष्टÑवादीचे नेतेसाध्वी प्रज्ञासिंह ही खरी दहशतवादी व राष्टÑविरोधी आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या खटल्याच्या तपासाची दिशा बदलली हे सर्वश्रुत आहे. भोपाळमधील धर्मनिरक्षेप मतदारांना साध्वीच्या देशविरोधी कृत्यांची माहिती पुराव्यानिशी दाखविणार आहोत. शहीद करकरे यांचा अपमान करणाऱ्यांना देशातील जनता कधीच माफ करणार नाही.-अंजुम इनामदार, अध्यक्ष, मुलनिवासी मुस्लीम मंच, पुणे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019bhopal-pcभोपाळSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर