शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हे तर चर्चेपासून पळ काढणारे  पळपुटे सरकार - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 05:50 IST

अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे केले स्पष्ट 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्यातील तीन पायांच्या सरकारला कुठलीच चर्चा नको आहे. चर्चेपासून पळ काढणारे हे इतिहासातील सर्वात छोटे अधिवेशन असल्याचा आरोप करतानाच या अधिवेशनात कोरोना काळातील भ्रष्टाचार, वीज बिलांची वसुली, महिला अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या   प्रश्नावर सभागृहात आवाज उठविणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर विशेषतः शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. बदल्या हेच या सरकारचे एकमेव काम आहे. आयएएस आणि आयपीएस बदल्यांमध्येसुद्धा भ्रष्टाचार सुरू आहे. असा दुर्दैवी प्रकार राज्यात यापूर्वी नव्हता. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ना कर्जमाफी मिळाली, ना प्रोत्साहन रक्कम. बोंडअळीमुळे कापूस गेला, ९० टक्के सोयाबीन गेले, पण शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. कोरोना काळात न वापरलेल्या विजेची अव्वाच्या सव्वा बिले आली. दोन वेळा या सरकारने वीज दरवाढ केली. आतापर्यंत साडेतीन लाख वीज कनेक्शन या सरकारने कापली. ७५ लाख लोकांना नोटिसा पाठविल्या. वीजबिलांच्या वसुलीचा हा प्रकार म्हणजे मोगलाई आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी राज्य सरकारला फटकारले.

महिला अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सत्तापक्षाचे नेते आणि मंत्रीच या अत्याचारात आघाडीवर आहेत. सामान्यांसाठी आणि सत्तापक्षासाठी वेगवेगळे न्याय आहेत. स्वतःच्या नेत्यांना लैंगिक स्वैराचाराची मुभाच दिली गेली आहे. शक्ती कायदा एक फार्स आहे. त्यामुळे या कायद्यासाठीच्या संयुक्त समितीतून भाजप आमदार बाहेर पडणार असल्याचा इशाराही फडणवीसांनी दिला.

‘सत्तेसाठी इतकी लाचारी नको’काँग्रेसने कायमच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. त्यांच्या नादी लागून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावरकरांचा अपमान करत आहेत. त्यांच्या पुण्यतिथीला ना अभिवादन केले, ना एक ट्विट. सत्ता येते, जाते. पण इतिहास सत्तेसाठी किती लाचारी स्वीकारतो त्याची नोंद करतो.  शिवसेनेने सत्तेसाठी इतकी लाचारी पत्करू नये, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस