शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रावण, माकड, कुत्रा, उंदीर... हेच का तुमचं 'प्रेम'? काँग्रेस नेत्यांनी वापरलेल्या शब्दांची यादी देत मोदींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 08:24 IST

प्रेमानं हरवू म्हणणाऱ्या राहुल गांधींवर मोदींचा निशाणा

नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी माझा द्वेष करतात. मात्र माझ्याकडून त्यांना प्रेमच मिळेल, असं वारंवार म्हणणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर मोदींनी जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस नेत्यांनी पातळी सोडून वापरलेल्या शब्दांची यादी देत हेच का तुमचं प्रेम, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते हरयाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये एका जनसभेला संबोधित करत होते. 'काँग्रेसचा एक नेता मला घाणेरड्या नाल्यातला किडा म्हणला होता. तर एकानं मला पिसाळलेला कुत्रा म्हटलं होतं. एकजण मला भस्मासूर म्हणाला होता. तर माजी परराष्ट्र मंत्री असलेला काँग्रेस नेता मला माकड म्हणाला होता. एकानं माझी तुलना दाऊद इब्राहिमशी केली होती. याशिवाय मला व्हायरस, हिटलर, बेजबाबदार आणि असभ्य मुलगा, रेबीज झालेला कुत्रा, उंदीरदेखील म्हटलं गेलं. रावण, साप, विंचू, विष ओकणारा माणूस, असे शब्ददेखील माझ्यासाठी वापरण्यात आले,' असं म्हणत मोदींनी काँग्रेसनं पातळी सोडून केलेल्या टीकेची आठवण उपस्थितांना करुन दिली. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर उपरोधिक टीका केली. काँग्रेस नेत्यांनी मर्यादा ओलांडून केलेल्या टीकेचा संदर्भ देत हाच काँग्रेसच्या प्रेमाचा शब्दकोष आहे का, असा सवाल मोदींनी विचारला. काँग्रेस असे शब्द वापरुन माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसच्या घराणेशाहीला आव्हान दिल्यानंच माझ्यावर अशा प्रकारची टीका होत असल्याचा दावा मोदींनी केला. 'मी त्यांचा भ्रष्टाचार थांबवला आणि त्यांच्या घराणेशाहीला आव्हान दिलं. त्यामुळेच आता ते प्रेमाचे मुखवटे घालून मला शिव्या देतात,' असं पंतप्रधान म्हणाले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Haryana Lok Sabha Election 2019हरियाना लोकसभा निवडणूक 2019kurukshetra-pcकुरुक्षेत्रNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस