शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र - नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 06:03 IST

आमदार फोडता येत नाही म्हणून आता अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः करत आहेत

मुंबई : रश्मी शुक्ला या अनधिकृत फोन टॅप करत होत्या म्हणूनच त्यांना वेगळ्या प्रकारची शिक्षा देऊन बदलण्यात आले. महाविकास आघाडी सरकार बनत असताना सर्वात महत्त्वाचे जे नेते होते त्यांचे फोनसुद्धा टॅप करण्याचे उद्योग रश्मी शुक्ला यांनी केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

आमदार फोडता येत नाही म्हणून आता अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः करत आहेत, असा आरोप करतानाच फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आल्याचे मलिक म्हणाले. राज्यपाल,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांची हालचाल, पोलीस रेकॉर्ड फडणवीस यांनी सादर केले. ते सादर करत असताना ही हालचाल होती की नाही हे मला माहिती नाही, असे सांगून फडणवीस जाणीवपूर्वक भ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.

भाजपने या देशात कर्नाटकचे सरकार पाडले. उत्तराखंड, ईशान्य भारतात सरकार बदल केला. त्यांना महाराष्ट्रात आमदार फोडता येत नाही म्हणून त्यासाठी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करून  हे सरकार बदलता येते का, हा प्रयत्न भाजप करत आहे. परंतु आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. जोपर्यंत सरकार फ्लोअरवर बहुमत सिद्ध करू शकत नाही तोवर कुठले सरकार सत्तेपासून दूर करता येत नाही. ते अधिकार राज्यपाल किंवा केंद्र सरकारला नाही, याची आठवण मलिक यांनी करून दिली.

सल्ल्याचे कागदही फडणवीस यांनी दाखवावेत सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी फडणवीस यांनी महाभियोक्ता यांचा सल्ला घेतला होता, असे सांगितले आहे. मग त्यांनी घेतलेल्या सल्ल्याचे कागदही फडणवीस यांनी दाखवले पाहिजेत. असे कुठलेही रेकॉर्ड सरकारमध्ये नाही, असा दावाही मलिक यांनी केला. पहिल्या दिवसापासून फडणवीस महाराष्ट्राची दिशाभूल करत होते. खोटे सांगून सरकारला बदनाम करण्याचे काम त्यांनी केले. परमबीरसिंग यांनी त्यांच्या चार अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत निर्णय घेऊन सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेतले, त्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचा आदेश नव्हता, असेही मलिक म्हणाले.

 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा