शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

दानवेंची जीभ घसरली; पुन्हा तीच चूक केली; जवानांना म्हणाले अतिरेकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 9:42 PM

आपल्या देशाचे 42 अतिरेकी मारले गेल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

औरंगाबाद- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची वादग्रस्त विधानांची मालिका काही थांबत नाहीये. जालना लोकसभा मतदारसंघातील रामनगर येथे रावसाहेब दानवे प्रचार कार्यालयाच्या उद्धाटनासाठी आले होते. उद्धाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा मागच्याच वादग्रस्त विधानाची री-ओढली आहे. आपल्या देशाचे 42 अतिरेकी मारले गेल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. रावसाहेब दानवेंनी पुन्हा एकदा जवानांना दहशतवादी संबोधले आहे. त्यामुळे रावसाहेब दानवेंना दहशतवादी आणि जवान यातील फरकच समजत नाही काय, असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय.गेल्या काही दिवसांपूर्वीही पुलवामा हल्ल्यावर बोलताना ते म्हणाले होते की, पाकिस्तानने देशातील 40 अतिरेकी मारले. विशेष म्हणजे त्यांचा या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, दानवेंनी शहीद जवानांचा अपमान केल्याची तीव्र भावना नेटकरी व्यक्त केली होती. या विधानावरून विरोधी पक्षांनीही दानवे लक्ष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसने दानवेंचा याबाबतच व्हिडीओ शेअर करून त्यांना हेच का भाजपाचे बेगडी देशप्रेम? असा प्रश्न विचारला होता. सोलापुरातील हेरिटेज येथे महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष दानवे बोलले होते की, आज देशामध्ये भयानक युद्धजन्य परिस्थिती आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आता देश सुरक्षित राहू शकतो, अशी तमाम देशवासीयांची भावना आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि मोदींचे हात बळकट करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. तर त्यानंतरही दानवेंनी वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच ठेवली.जालन्यात केलेल्या एका विधानामुळे दानवे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. दानवे यांनी बोलता बोलता विंग कमांडर अभिनंदन याला हेलिकॉप्टरचा पायलट असं म्हटलं होतं. खरं तर अभिनंदन हे भारताच्या लढाऊ विमानांचे धडाकेबाज वैमानिक आहेत. या नव्या विधानानंतर दानवेंवर पुन्हा एकदा चहू बाजूंनी टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी दानवेंर निशाणा साधला होता. धनंजय मुंडेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, बे एके बे, बे दुने चार, बे त्रिक बेअक्कल. त्यानंतर त्यांनी 'येडं पेरलं आणि खुळं उगवलं' अशी भाजपाची सगळी गत झाल्याचीही टीका केली आहे. यांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-२१ आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष, असंही ते म्हणाले होते. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019