शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांना कोर्टाची अवमानना नोटीस जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 03:49 IST

फ्रान्समधील डसॉल्ट कंपनीकडून राफेलची लढाऊ विमान खरेदीशी संबंधित एका प्रकरणाचा गेल्या आठवड्यात निकाल देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘चौकीदार चोर है’, असे भाष्य आपण कधीही केलेले नव्हते,

नवी दिल्ली: फ्रान्समधील डसॉल्ट कंपनीकडून राफेलची लढाऊ विमान खरेदीशी संबंधित एका प्रकरणाचा गेल्या आठवड्यात निकाल देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘चौकीदार चोर है’, असे भाष्य आपण कधीही केलेले नव्हते, असे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने असे चुकीचे विधान आपल्या तोंडी घातल्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सोमवारी न्यायालयीन अवमानाची (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) नोटीस जारी केली आहे.मूळ राफेल विमान खरेदी प्रकरणात गेल्या जानेवारी महिन्यामध्ये दिलेल्या निकालाचा फेरविचार करण्यासाठी करण्यात आलेल्या याचिकांसाठी संरक्षण मंत्रालयाच्या फायलींमधून अनधिकृतपणे मिळविलेल्या दस्तावेजांचा वापर केलेला असल्याने पुरावे म्हणून त्यांचा विचार करू नये, हा केंद्र सरकारने घेतलेला प्राथमिक आक्षेप अमान्य करण्याचा निकाल सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने गेल्या गुरुवारी दिला होता.सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला, त्याच सुमारास राहुल गांधी यांनी अमेठीमध्ये आपला निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी ‘अब सर्वोच्च न्यायालयने भी कहा है की चौकीदार चोर है’, असे विधान केले होते.सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यक्षात न केलेले वक्तव्य न्यायालायच्या तोंडी घालून आणि तसा जाहीर गैरसमज निर्माण करून गांधी यांनी न्यायालयाचा अवमान केला असल्याने त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, अशी याचिका भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी लगेच अवमानना याचिका दाखल केली.मीनाक्षी लेखी यांची ही याचिका सोमवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठापुढे आली, तेव्हा न्यायालयाने राहुल गांधी यांनी केलेले विधान धादान्त असत्य असल्याचे स्पष्ट करून त्याचा खुलासा करण्यासाठी त्यांना नोटीस जारी केली.राहुल गांधी यांनी आपले उत्तर २२ एप्रिलपर्यंत न्यायालयाला द्यायचे आहे. त्यानंतर पुढील सुनावणी येत्या मंगळवारी २३ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.>‘न्यायालयाने तसे विधान केलेलेच नाही’खंडपीठाने नमूद केले की, राहुल गांधी यांनी या न्यायालयाने काही विधाने वा भाष्य केल्याची अथवा निष्कर्ष नोंदविल्याचे वक्तव्य माध्यमांमध्ये केले आहे, तशी विधाने किंवा भाष्ये न्यायालयाने कधीही केलेली नाहीत. पण तशी विधाने तयंनी न्यायालयाच्या तोंडी घालली आहेत. काही कागदपत्रे न्यायालयीन कामकाजात ग्राह्य धरण्याविषयी अ‍ॅटर्नी जनरलनी उपस्थित केलेल्या आक्षेपावर आम्ही निकाल देत होतो. त्यामुळे न्यायालयाने अशी कोणताही विधाने त्यावेळी करण्याचा मुळात प्रश्नच नव्हता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRafale Dealराफेल डील