शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राहुल गांधी ठरविणार उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 06:04 IST

Rahul Gandhi : राजीव सातव यांच्या पत्नीचाही राज्यसभेसाठी विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे.

- व्यंकटेश केसरी

नवी दिल्ली : काँग्रेसचेराज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या त्या जागेवर कोणता उमेदवार निवडावा याचा निर्णय काँग्रेस नेते राहुल गांधी घेणार आहेत. त्यांच्या या निर्णयावर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी शिक्कामोर्तब करतील. या जागेसाठी काँग्रेसमधील अनेक नेते इच्छुक असून त्यांनी त्या दिशेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजीव सातव यांच्या पत्नीचाही राज्यसभेसाठी विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे.

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेची ही रिक्त जागा मित्रपक्षांशी झालेल्या समझोत्यानुसार यापुढेही काँग्रेसकडेच राहाणार आहे. त्या जागेसाठी पोटनिवडणूक कधी होणार हे मात्र अद्याप जाहीर झालेले नाही. या जागेवरून राज्यसभेवर जाण्यासाठी काँग्रेसमधील गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, अविनाश पांडे, उत्तमसिंह पवार, अनंत गाडगीळ, रजनी पाटील असे अनेक काँग्रेस नेते उत्सुक आहेत. काँग्रेसच्या विद्यमान कार्यपद्धतीबद्दल ज्या २३ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती त्यामध्ये गुलाम नबी आझाद व मुकुल वासनिक यांचा समावेश आहे. 

उत्तमसिंह पवार, गाडगीळ यांच्या नावांचीही चर्चासचिन पायलट यांच्या अयशस्वी बंडाच्या प्रयत्नानंतर अविनाश पांडे यांच्याकडून राजस्थानचे प्रभारीपद काँग्रेसने काढून घेतले होते. काँग्रेस नेत्या रजनी पाटील या महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी उत्सुक असल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेस नेते अनंत गाडगीळ तसेच उत्तमसिंह पवार यांंनाही राज्यसभेवर जाण्याची इच्छा आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस